AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरीला कोल्ड्रिंकमध्ये बिअर टाकून पाजली अन् खेळ खल्लास, सुहागरातीला काय घडलं?

मिर्झापूर जिल्ह्यातील कछवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नवरदेवाने सुहागरात्रीच्या दिवशी आपल्या नववधूला कोल्ड्रिंकमध्ये बिअर आणि ठंडाईत भांग टाकून पाजले. याची माहिती मिळताच नवरीने पोलिसात तक्रार दाखल केली आणि लग्न मोडण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

नवरीला कोल्ड्रिंकमध्ये बिअर टाकून पाजली अन् खेळ खल्लास, सुहागरातीला काय घडलं?
CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 24, 2025 | 4:41 PM
Share

उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. मिर्जापूर जिल्ह्यातील कछवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सुहागरात्रीच्या दिवशी नवरदेवाने नवरीला कोल्ड्रिंकमध्ये बिअर आणि ठंडाईत भांग टाकून पाजली. नवरीला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा ती जाम भडकली. तिने थेट पोलीस स्टेशन गाठून नवऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पंचायत भरली आणि तात्काळ लग्न मोडण्यात आलं. आपल्याच कर्मामुळे नवरदेवाला लग्नानंतर लग्नाचा पाच दिवसही आनंद घेता आला नाही.

मिर्झापूर कछवा परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. एका नवरदेवाने सुहागरात्रीनंतर पत्नीला गाफिल ठेवून तिला नशा येणारा पदार्थ पाजला. त्याने कोल्डिंकमध्ये बिअर आणि ठंडाईत भांग टाकून नवरीला पाजली. जेव्हा नवरीला याबाबत माहिती मिळाली तेव्हा ती रागाने लालबुंद झाली. त्यानंतर तिने तात्काळ पोलीस स्टेशन गाठून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. वाचा: वयाच्या ६० व्या वर्षी भेटली बालपणीची गर्लफ्रेंड, वकीलाच्या बायको-मुलांना कळताच… जे घडलं ते ऐकून चकीत व्हाल

कछवा जिल्ह्यातील गावात काय घडलं?

ही घटना कछवा जिल्ह्यातील एका गावात घडली. वाराणासी जिल्ह्यातील कपसेठी ठाणे परिसरातील तरुणीचं 15 मे रोजी लग्न झालं होतं. मिर्झापूरच्या कछवा येथील एका गावात हे लग्न झालं. लग्नाच्या पाच दिवसानंतर ही घटना घडली. आपल्याला फसवून नशेचे पदार्थ दिल्याची माहिती तिला कळली. त्यामुळे ती खूप नाराज झाली. तिने लगेच याचा माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. नवरीच्या घरचे लोक आले आणि ते आपल्या मुलीला घेऊन गेले. तर त्यांच्यापाठोपाठ नवऱ्याचे आईवडीलही मुलीच्या घरी गेले आणि मुलीला परत पाठवण्याची विनंती करू लागले.

दोन्ही कुटुंबात शाब्दिक चकमक

यावेळी दोन्ही कुटुंबामध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे नवरीच्या घरच्यांनी चिडून जाऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कपसेठी पोलीस ठाण्याने आधी हे प्रकरण नोंदवून घेण्यास नकार दिला. घटना मिर्झापूरच्या कछवा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडल्याने तिकडेच गुन्हा नोंदवा असं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी कछवा पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल केला.

पोरगी ऐकेना

पोलिसांनी त्यानंतर दोन्ही कुटुंबातील लोकांना पोलीस ठाण्यात बोलावलं. बराच काळ दोन्ही कुटुंबांना समजवण्याचा प्रयत्न झाला. पण मुलगी काही ऐकायला तयार नव्हती. दोन्ही कुटुंबात बराचवेळा नंतरही काहीच समझोता झाला नाही. त्यामुळे अखेरीस लग्न मोडण्याचा निर्णय घेण्यात आला. अन् पाच दिवसातच लग्न मोडण्यात आलं. पीडितेच्या आरोपाच्या आधारे दोन्ही कुटुंबांना पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. पण मुलगी नवऱ्याच्या घरी जायला तयार नव्हती, असं पोलीस अधिकारी रणविजय सिंह यांनी सांगितलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.