AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : तरुणीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या परप्रांतीय तरुणाला मनसे पदाधिकाऱ्यांकडून चोप, व्हिडीओ व्हायरल

तरुणीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या परप्रांतीय तरुणाला मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला (MNS leader beat youth who send obscene messages to young woman)

VIDEO : तरुणीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या परप्रांतीय तरुणाला मनसे पदाधिकाऱ्यांकडून चोप, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Mar 23, 2021 | 3:31 PM
Share

डोंबिवली (ठाणे) : तरुणीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या परप्रांतीय तरुणाला मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला आहे. संबंधित तरुण हा एसी मॅकेनिक आहे. तो गेल्या काही दिवसांपासून तरुणीला वारंवार अश्लील मेसेज पाठवत होता. त्यामुळे तरुणी वैतागली होती. अखेर या प्रकरणाची माहिती मिळताच मनसे पदाधिकाऱ्यांनी तरुणाच्या कार्यालयात जावून चोप दिला. तरुणाला मारहाण करताना व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या प्रकरणामुळे डोंबिवली शहरात एकच खळबळ उडाली आहे (MNS leader beat youth who send obscene messages to young woman).

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवली पूर्वेतील देसले पाडा परिसरात राहणारा एक परप्रांतीय तरुण एका मराठी तरुणीस वारंवार अश्लील मेसेजे पाठवायचा. त्यामुळे संबंधित तरुणी त्रस्त झाली होती. अखेर या प्रकरणाची माहिती मिळताच मनसेचे रस्ते आस्थापना डोंबिवली शहराध्यक्ष ओम लोके आणि शाखा प्रमुख रितेश माळी हे त्याठिकाणी पोहचले. एसी दुरुस्ती करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात भीम सहानी तरुण काम करतो. त्याच कार्यालयात ती तरुणीही काम करते. काही दिवसांपासून भीम सहानी हा तरुण त्या तरुणीला अश्लील मेसेज पाठवित होता. त्यामुळे तरुणी त्रस्त झाली होती.

मनसे पदाधिकाऱ्यांनी अखेर त्या कार्यालयात धाव घेत एसी मॅकेनिक भीम सहानी याला गाठले. त्याला तिथेच चोप दिला. यापूढे या तरुणीला कोणताही मेसेज पाठविणार नाही, अशी हमी भीम सहानी याने दिली. मूळचा उत्तर प्रदेशात राहणारा हा तरुण तीन वर्षांपूर्वी डोंबिवलीला आला आहे. तो एसी मॅकेनिक आहे. या तरुणाला मारहाणीची व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मारहाणीची घटना आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत काय दिसतंय?

या प्रकरणाशी संबंधित व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत मनसे पदाधिकारी मारहाण करताना दिसत आहे. याशिवाय संबंधित तरुण हा माफी मागताना दिसत आहे. त्याचबरोबर आपण यापुढे अशा प्रकारचं कृत्य करणार नाही, असंही तो म्हणतोय. दरम्यान, उत्तर भारतीयांमुळे मराठी मुलांना जॉब मिळत नाही, असं मनसे पदाधिकारी व्हिडीओत बोलताना दिसत आहे (MNS leader beat youth who send obscene messages to young woman).

व्हिडीओ बघा

हेही वाचा : आधी शिवसेनेचा भाजपला धक्का, नंतर मनसेचा शिवसेनेला झटका, केडीएमसीत पूलांच्या लोकार्पणावरुन राजकारण

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.