मनसे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा; शिवसेना आमदाराची खोचक टीका

कल्याणमध्ये वडवली रेल्वे उड्डाण पुलाचे औपचारीक लोकार्पण रद्द झाल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी या पूलाचे लोकार्पण करुन पूल वाहतुकीसाठी खुला केला होता (Shivsena MLA Vishwanath Bhoir).

मनसे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा; शिवसेना आमदाराची खोचक टीका
Raju-Patil-Shivsena MLA

कल्याण : कल्याणमध्ये वडवली रेल्वे उड्डाण पुलाचे औपचारीक लोकार्पण रद्द झाल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी या पूलाचे लोकार्पण करुन पूल वाहतुकीसाठी खुला केला होता. रात्री हा पूल बंद करण्यात आला आहे. या पुलाचे काही दिवसात लोकार्पण होणार आहे, अशी घोषणा शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. तसेच, कोणता तरी स्टंट करुन खोडसाळपणा करण्याचं मनसेचे कामच आहे. आयत्या बिळावर नागोबा बनण्याचे काम मनसेने केले आहे, अशी खोचक टिका शिवसेना आमदारांनी मनसे आमदारांवर केली आहे (Shivsena MLA Vishwanath Bhoir Criticize MNS MLA Raju Patil).

कल्याण डोंबिवलीत सध्या पुलावरुन राजकारण चांगले तापलेले आहे. कोपर पुलानंतर आता कल्याण जवळ असलेल्या वडवली रेल्वे उड्डाणपुलावरुन शिवसेना-मनसेत जुंपली आहे. सोमवारी पुलाचे लोकार्पण रद्द झाल्याने मनसे आमदार राजू पाटील शेकडो कार्यकर्त्यांसोबत या पुलावर पोहोचले. त्यांनी या पुलाचे उद्घाटन करुन पूल वाहतूकीसाठी खुला केला.

“मनसेने राजकीय स्टंटबाजी करीत खोडसाळपणा केला”

रात्रीच्या वेळेत पुन्हा हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. आता मनसेच्या या लोकार्पण कार्यक्रमावर शिवसेनेने घणाघाती टीका केली आहे. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचे म्हणणे आहे की, वडवली पुलाचे लोकार्पण काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आले. त्याची माहिती सर्व आमदारांना दिली होती. असे असताना मनसेने राजकीय स्टंटबाजी करीत खोडसाळपणा केला आहे (Shivsena MLA Vishwanath Bhoir Criticize MNS MLA Raju Patil).

शिवसेने या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केला आहे. विशेष म्हणजे या पुलाच्या कामासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न उद्धवला. तेव्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: लक्ष घालून हा विषय मार्गी लावला होता. त्यामुळे या पुलाचा मार्ग मोकळा झाला होता. शिवसेना विकास कामांचा पाठ पुरावा करते. कामे मार्गी लावते.

या कामांचे श्रेय घेण्याचे काम मनसेकडून केले जाते. त्याचाच प्रत्यय वडवली पूलाच्या अनधिकृत लोकार्पण करण्याच्या कृतीतून समोर आला आहे. पुलाचे अनधिकृत लोकार्पण असल्याने आता पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. लवकरच या पुलाचे अधिकृत लोकार्पण केले जाणार आहे.

Shivsena MLA Vishwanath Bhoir Criticize MNS MLA Raju Patil

संबंधित बातम्या :

PHOTO | कल्याण-डोंबिवलीकरांसाठी खुशखबर, 25 जानेवारीला पत्री पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी दिवाळी दसरा, पत्री पुलाचं काम पूर्ण!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI