नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकच्या विविध भागात खाजगी सावकारीला (Moneylender) कंटाळून पाच जणांनी जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे. नाशिक शहर पोलीसांनी (Nashik Police) खाजगी सावकारांच्या विरोधात धाडसत्रही सुरू केले आहे. यामध्ये खाजगी सावकारीला कंटाळून विषप्राशन केल्याची घटना ताजी असतांना एका तरुणाचे अपहरण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिकच्या तरुणाला दोघा सावकारांसह इतर साथीदारांवर नाशिक शहर पोलीसांनी गुन्हा दाखल (Nashik Crime News) केला आहे. त्यामुळे खाजगी सावकारांचा जाच अजूनही सुरूच असल्याचं समोर येत असून नाशिकमध्ये खाजगी सावकारांचीच जोरदार चर्चा होऊ लागली आहे.