एकवेळ प्रियकरासोबत मरेन, पण पतीसोबत राहणार नाही… तीन मुलाची आई ड्रायव्हरसोबत पळाली; नवरा म्हणतो…

पूर्णिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन मुलांची आई ड्रायव्हर सोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. नवऱ्याच्या छळाला कंटाळून आपण पळून गेल्याचं या महिलेचं म्हणं आहे.

एकवेळ प्रियकरासोबत मरेन, पण पतीसोबत राहणार नाही... तीन मुलाची आई ड्रायव्हरसोबत पळाली; नवरा म्हणतो...
wifeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 8:04 AM

पूर्णिया : बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने त्याच्याच पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पत्नी पळून गेल्याची ही तक्रार आहे. तीन मुलं असतानाही त्याची पत्नी ड्रायव्हरसोबत पळून गेली. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मी दिवसभर गॅरेजमध्ये कामाला असायचो. त्याच दरम्यान या दोघांचे सूत जुळले आणि ती तीन मुलांना टाकून पळून गेली, असं त्याने तक्रारीत म्हटलं आहे.

माझा या ड्रायव्हरवर आधीपासूनच संशय होता. अनेकदा पत्नीला त्याच्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. त्यानंतर ड्रायव्हरला मारहाण करून पळवून लावले होते, असं पीडित व्यक्तीचं म्हणणं आहे. ड्रायव्हरला मारहाण केल्यानंतर प्रकरण मिटलं असं त्याला वाटलं होतं. पण त्याची पत्नी ड्रायव्हरसोबत पळून गेली. तेव्हा त्याला धक्का बसला. विशेष म्हणजे त्याची पत्नी पळून गेल्याचं कुणालाच कळलं नाही. पत्नीकडे तीन वेगवेगळे महागडे मोबाईल होते. तेव्हाच मला काही तरी काळंबेरं असल्याचा संशय आला होता, असंही त्याने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

अपहरण झालं नाही

या प्रकरणानंतर ड्रायव्हर आणि सदर महिलेने आपण आपल्या मर्जीने पळून गेल्याचं फोनवरून सांगितलं. माझ अपहरण झालं नाही. पतीच्या छळाला कंटाळून मी घर सोडून गेले. मी माझ्या तीन मुलांची जबाबदारी घेणार नाही. ती जबाबदारी नवऱ्याची असेल. मी प्रियकरासोबत मरेल, पण नवऱ्यासोबत राहणार नाही, असंही या महिलेने म्हटलं आहे.

पोलीस तपास सुरू

याप्रकरणी बनमखी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. चौकशीच्या आधारेच पुढील कारवाई होईल, असं पोलीस अधिकारी वरूण झा यांनी सांगितलं. दरम्यान, या घटनेमुळे पूर्णियातील लोक आश्चर्य चकीत आहेत. एखादी महिला आपल्या चिल्यापिल्ल्यांना सोडून कशी जाऊ शकते? असा सवाल लोक करत आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.