AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माता तू न वैरिणी…! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलीला संपवण्याचा आईनेच केला प्रयत्न

Kolkata Crime News : आई हे आपले सर्वस्व असते, मायेचे दुसरे रूप म्हणजे आई ! पण कलकत्ता येथे एका आईने आपल्याच मुलीचे आयुष्य स्वत:च्याच हाताने संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

माता तू न वैरिणी...! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलीला संपवण्याचा आईनेच केला प्रयत्न
अनैतिक संबंधातून पत्नी आणि भावाने तरुणाला संपवलेImage Credit source: freepik
| Updated on: May 03, 2023 | 9:15 AM
Share

कलकत्ता : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ! असं म्हणतात. पण नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्हीही म्हणाल, माता तू न वैरिणी…! विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलीचे आयुष्य तिच्या आईनेच (woman tried to kill daughter) संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेवर तिच्या पोलीस प्रियकरासोबत (planning with lover) कट रचून, तिच्या सोळा वर्षांच्या मुलीला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी हरिदेवपूर पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. कलकत्त्यामधील हरिदेवपूर येथील मोतीलाल गुप्ता रोड परिसरात ही खळबळजनक घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे तर प्रसून असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.आरोपी पोलीस कर्मचारी वाहतूक पोलीस हवालदार आहे.

अवैध नात्यात मुलगी बनली अडसर, म्हणून प्रियकरासोबत रचला कट

सोनाली यांचे पती कौशिक हे व्यवसायाने व्यापारी आहेत. त्यांना एक मुलगी आहे. या परिसरात राहणाऱ्या व्यक्तीबत सोनालीचे अनेक वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. सोनालीच्या मुलीला हा प्रकार कळला. यावरून तिचे अनेकवेळा आईसोबत भांडण झाले होते. यामुळे सोनालीने मुलीला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची तरुणीने हरिदेवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सोनालीला अटक केली.

त्या मुलीच्या सांगण्यानुसार, तिची आई सोनाली हिचे विवाहबाह्य संबंध आहेत. तिने प्रियकराशी सल्लामसलत करून मुलीच्या हत्येचा कट रचला. ही मुलगी घरात असताना महिलेने आग लावल्याचा आरोप आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवून ते परतले. नंतर मुलगी आईविरुद्ध काही पुरावे घेऊन पोलिस ठाण्यात हजर झाली.

हत्या आणि कट रचल्याचा आरोप असलेली आई आणि प्रियकराला अटक

याप्रकरणी मुलगी तक्रार दाखल करण्यासाठी मुलगी पोलिस स्थानकात पोहोचली. त्या मुलीने तिची आई ‘बॉयफ्रेंडशी’ मोबाईलवर बोलत असल्याचे पुरावे पोलिसांना दाखवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेथून कट आणि हत्येचा कट रचल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यानंतर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आरोपी महिलेला अटक करण्यात आली.

या महिलेचा प्रियकर प्रसून  ( वय 40) हा हुगळीच्या चंदननगरचा रहिवासी आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा राज्य पोलीस दलात कर्मचारी आहे. सोनाली ही मुलीसह वेगळी रहात होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. मात्र विवाहबाह्य संबंधांमुळे आईने मुलीला मारण्याचा कट रचला, अशी तक्रार आहे. पोलिसांनी सोनाली आणि तिच्या प्रियकराचे मोबाईल जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या हत्येचा कट रचल्याचा पुरावाही सापडला असून आता त्यांच्याकडे याबाबत चौकशी सुरू आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.