AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ‘संडास साफ करणारा पोरगा कधीपासून बंदुक…’, संजय राऊतांचा रोखठोक सवाल

Sanjay Raut : "अक्षय शिंदेच एन्काऊंटर केलं, मग आता शेकडो आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या. झटपट न्याय करा, अशी आंदोलकांची मागणी होती. पोलिसांच्याा कमरेवरची बंदुक खेचून कोणी आत्महत्या करतो का? नंतर बोलतात एन्काऊंटर केलं. आधी काय खोट बोलायचय ते ठरवा" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : 'संडास साफ करणारा पोरगा कधीपासून बंदुक...', संजय राऊतांचा रोखठोक सवाल
संजय राऊत
| Updated on: Sep 24, 2024 | 9:22 AM
Share

“पोलिसांच्या कमरेवरची बंदुक हिसकावणार. ती लॉक झालेली बंदुक फायर करणार हे कोणाला पटेल का? हे कोणाला पटू शकतं का? संडास साफ करणारा पोरगा कधीपासून बंदुक चालवायला लागला?” असा सवाल संजय राऊत यांनी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात उपस्थित केला आहे. बदलापूरच्या शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे काल पोलीस एन्काऊटरमध्ये मारला गेला. “पोलीस, सरकार, फडणवीस, एकनाथ शिंदे हे आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचवत आहेत. त्यासाठी मुख्य पुरावा नष्ट केला” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

“हजारो बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरुन त्यादिवशी सरकारकडे एकच मागणी केली, आरोपीला आताच्या आता फाशी द्या, आम्ही न्याय देतो. मंत्र्यांना पिटाळून लावलं. अधिकाऱ्यांना येऊ दिलं नाही. जनता इतकी संतप्त होती, ही लोक भावना आहे” असं संजय राऊत म्हणाले. “दुसऱ्यादिवशी देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. फास्ट ट्रॅकवर खटला चालवू असं एकनाथ शिंदे म्हणाले. माझा प्रश्न सरकारला आहे, दुसऱ्यादिवशी हजारो आंदोलकांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला? त्यांची मागणी न्याय होती, हे एन्काऊंटरमधून सिद्ध केलं. तुम्ही कोर्टात खटला चालवला नाही. मग तुम्ही शेकडो आंदोलकांनवर गुन्हे दाखल करुन धिंड काढली ते गुन्हे मागे घ्या” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

‘त्यांना वाचवण्याासाठी हे सर्व केलं’

“कोणाला तरी वाचवायचं आहे, ज्यांना वाचवायच आहे, त्यांच्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचा वरदहस्त आहे. शाळेचं सीसीटीव्ही फुटेज का काढलं? साीसीटीव्ही फुटेज ज्याला मारलं त्याने काढलेलं नाही. शाळेच्या संस्था चालकाने ते फुटेज काढून टाकलं. ही शाळेची संस्था भाजपाशी संबंधित आहे. हे सगळे शिंदे, फडणवीसांशी संबंधित आहेत. म्हणून त्यांना वाचवण्यासाठी हे सर्व केलं” असं आरोप संजय राऊत यांनी केला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ