
राज्यामध्ये गुन्ह्यांच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या असून सांगलीमध्ये (Sangli Crime) अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच नेत्याची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला असून हत्या करणारा आरोपी हा देखील जमावाच्या हल्ल्यात ठार झाला असून दुहेरी हत्येने सांगलीत भयानक दहशत माजली आहे. दलित महासंघ अध्यक्ष उत्तम मोहितेंचा निर्घृण खून झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे वाढदिवसाच्या दिवशीच त्यांची हत्या झाली. तर खुनी हल्ला करत त्यांची हत्या करणाऱ्या आरोपीवर जमावाने हल्ला चढवत त्याला मारहाण केली. त्यामध्ये तो गंभार जखमी झाला. उपचारांसाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथेच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सांगली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
मुळशी पॅटर्न प्रमाणे वाढदिवसा दिवशीच खून
दुहेरी खुनाच्या घटनेने सांगली हादरली आहे. शहरातील गारपीर चौक येथे घडला दुहेरी खुनाचा थराराक प्रसंग घडला. सांगलीत दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांचा मुळशी पटर्न प्रमाणे वाढदिवसा दिवशीच खून झाला. मोहिते हे वाढदिवस साजरा करत होते, तेवढ्यात आरोपी शाहरुख शेख तिथे आला. त्याने वाढदिवसानिमित्त उत्तम मोहिते यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्याने मोहिते यांच्यावर हल्ला चढवत त्यांची हत्या केली आणि एकच गदारोळ माजला.
जमावाच्या मारहाणीत आरोपीचाही मृत्यू
मोहिते यांची हत्या झाल्यावर त्यांचे समर्थक भयानक चिडले. मोहिते समर्थकांनी हल्लेखोर आरोपी शाहरुख शेखवर प्रती हल्ला केला. त्याला पकडून जबर मारहाण केली. ज्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला. अखेर त्याला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचारांदरम्यानच शेख याचा मृत्यू झाला. आज सकाळी शाहरूख शेख याला मृत घोषित करण्यात आले. मात्र या घटनेने सांगलीत खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सांगलीच्या गारपीर परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. या प्रकरणात चार आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सांगली पोलिस अधिक तपास करत आहे.