मुंबईत 29 वर्षीय डॉक्टर तरुणीची आत्महत्या, इंजेक्शन घेऊन आयुष्य संपवलं

निताशा बंगालीला कुटुंबियांनी नायर रुग्णालयात नेले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले (Mumbai doctor Suicide injection)

मुंबईत 29 वर्षीय डॉक्टर तरुणीची आत्महत्या, इंजेक्शन घेऊन आयुष्य संपवलं
doctor

मुंबई : 29 वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. इंजेक्शन घेऊन डॉ. निताशा बंगाली हिने आपलं आयुष्य संपवलं. मुंबईतील वरळी भागात दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली. (Mumbai 29-year-old doctor commits Suicide taking injection)

इंजेक्शन टोचल्याने तब्येत बिघडली

डॉ. निताशा बंगाली आपल्या आई-वडिलांसह मुंबईतील वरळी भागात राहत होती. मेडिकलचे उच्चशिक्षण घेत असलेली निताशा गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनशी झुंजत होती. गुरुवारी तिने राहत्या घरी स्वतःला इंजेक्शन टोचून घेतले. त्यानंतर तिची तब्येत खालावत गेली. त्यानंतर तिने स्वतःच आईला याविषयी माहिती दिली.

सुसाईड नोट नाही

निताशा बंगालीला कुटुंबियांनी नायर रुग्णालयात नेले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांच्या माहितीनुसार निताशाची आईही डॉक्टर आहे, तर तिचे वडील इंजिनिअर आहेत. निताशा एमबीबीएस डॉक्टर होती, तर एमडीचे शिक्षण घेत होता. आतापर्यंत तिच्याकडे कुठलीही सुसाईड नोट सापडलेली नाही.

अभ्यासाबाबत निताशा तणावाखाली होती. तिच्या डिप्रेशनवर उपचारही सुरु होते, अशी माहिती आहे. पोस्टमार्टम अहवालानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

जालन्यात नवविवाहित डॉक्टरची आत्महत्या

दुसरीकडे, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अशीच धक्कादायक घटना घडली होती. 24 वर्षीय नवविवाहित महिला डॉक्टर प्रांजल कोल्हे हिने आत्महत्या केली. डॉ. प्रांजल कोल्हे हिचा अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. ‘पप्पा मला माफ करा’ अशी चिठ्ठी आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर प्रांजल कोल्हे हिने वडिलांच्या नावे लिहिली होती. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये, असेही डॉक्टर प्रांजलने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते

संबंधित बातम्या :

34 वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या, 18 व्या मजल्यावरील घरातून उडी

सॉरी बाबा, सासरी येऊन चुकले, रडत-रडत व्हिडीओ रेकॉर्ड, विवाहितेची आत्महत्या

(Mumbai 29-year-old doctor commits Suicide taking injection)