34 वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या, 18 व्या मजल्यावरील घरातून उडी

डॉ. विनिता राय गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली (Uttar Pradesh Lady Doctor Suicide)

34 वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या, 18 व्या मजल्यावरील घरातून उडी
नोएडामध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या

लखनौ : इमारतीच्या 18 व्या मजल्यावरुन उडी घेत महिला डॉक्टरने आत्महत्या केली. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 34 वर्षीय डॉ. विनिता राय गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती तिच्या पतीने दिली आहे. (Uttar Pradesh Noida 34 Years old Lady Doctor commits Suicide from own flat)

डॉ. विनिता राय आयुर्वेदाच्या डॉक्टर

नोएडातील सेक्टर 77 मध्ये प्रतीक विस्टीरिया हाऊसिंग सोसायटीमध्ये डॉ. विनिता राय पतीसह राहत होती. बिल्डिंगच्या 18 व्या मजल्यावरील घरातून तिने शनिवारी उडी घेतली होती. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. डॉ. विनिता यांनी उचललेल्या धक्कादायक पावलामुळे कुटुंबीयही हैराण आहेत. डॉ. विनिता राय आयुर्वेदाच्या डॉक्टर होत्या. नोएडातील पिलखुआ भागात एका रुग्णालयात त्या कार्यरत होत्या.

डॉक्टरवर मानसोपचार

डॉ. विनिता गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होत्या. नोएडातील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना तणावाबाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न सुरु होते. मात्र उपचाराचा फायदा झाला नाही, असं तिच्या पतीने सांगितलं.

खडकवासला धरणात तरुणाची आत्महत्या

गाडी विकून येणारे पैसे माझ्या आईला द्या, असा व्हॉईस मेसेज चुलत भावाला पाठवून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. 31 वर्षीय तरुणाने खडकवासला धरणात उडी घेऊन आयुष्य संपवलं.

चंद्रशेखर गोपाळ पुजारी या तरुणाने पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरणाच्या भिंतीजवळ पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. तो पुण्यातील सोमवार पेठ भागातील रहिवासी होता. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

चुलतभावाला व्हॉईस मेसेज

चंद्रशेखर गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरणाजवळ गेला होता. तिथून त्याने आपल्या चुलत भावाला व्हॉइस मेसेज पाठवला होता. ‘माझी गाडी खडकवासला धरणाजवळ लावली आहे. मी आत्महत्या करत आहे. माझ्या आईची काळजी घ्या. गाडी विकून जे पैसे येतील, ते माझ्या आईला द्या’ असा तो मेसेज होता.

संबंधित बातम्या :

हळद लागताना पोलीस आले, गर्लफ्रेण्डच्या हत्येप्रकरणी नवरदेवाला पिवळ्या अंगानेच गाडीत कोंबलं

63 वर्षीय डॉक्टर पतीची हत्या, 61 वर्षीय प्रोफेसर पत्नीला अटक

(Uttar Pradesh Noida 34 Years old Lady Doctor commits Suicide from own flat)