AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हळद लागताना पोलीस आले, गर्लफ्रेण्डच्या हत्येप्रकरणी नवरदेवाला पिवळ्या अंगानेच गाडीत कोंबलं

ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती (Groom Haldi Wedding Girlfriend Murder)

हळद लागताना पोलीस आले, गर्लफ्रेण्डच्या हत्येप्रकरणी नवरदेवाला पिवळ्या अंगानेच गाडीत कोंबलं
हळद सुरु असतानाच पोलिसांची एन्ट्री
| Updated on: May 09, 2021 | 1:15 PM
Share

भोपाळ : नवरदेवाला हळद लागत होती, लग्नघरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. इतक्यात पोलिसांनी फिल्मी स्टाईल एन्ट्री घेतली. गर्लफ्रेण्डच्या हत्येप्रकरणी पिवळ्या अंगानेच त्याला गाडीत कोंबून घेऊन गेले. मध्य प्रदेशातील गुणामध्ये कोल्हूपुरा भागात घडलेल्या या प्रकारामुळे नवरदेव संजय कोरीचे कुटुंबीयही थक्क झाले. लग्नाच्या बेडीत अडकण्याची स्वप्न पाहणाऱ्या नवरदेवाला पोलिसांच्या खऱ्याखुऱ्या बेड्या पडल्या. (Groom arrested while getting ready for Haldi Ceremony of Wedding for Girlfriend Murder)

ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या महिलेची हत्या

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील बदरवास भागात ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळला होता. लक्ष्मी तोमर हिचा मृतदेह 30 एप्रिलला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 (NH 46) वर रस्त्याच्या कडेला सापडला होता. मध्य प्रदेशात कोरोना कर्फ्यू असताना हा प्रकार समोर आला होता. महिलेची ओळख पटवणारा कुठलाही पुरावा न मिळाल्याने पोलिसही गोंधळात पडले होते.

पोलिसांनी सोशल मीडियावर महिलेच्या मृतदेहाचा फोटो शेअर करत तिची ओळख पटवण्याचं आवाहन केलं होतं. 5 मे रोजी हा मृतदेह ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या लक्ष्मी तोमर हिचा असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी तपास करत संजय कोरीचा माग काढला.

घटस्फोटित महिलेशी आरोपी नवरदेवाचे संबंध

पोलिसांनी आरोपी नवरदेव संजय कोरी याची धरपकड केली. संजयने लक्ष्मीसोबत आपल्या अनैतिक संबंधांची कबुली दिली. ती घटस्फोटित होती. मात्र संजयवर लग्नासाठी दबाव आणत होती. मात्र संजयला लक्ष्मीसोबत लग्न करण्यात रस नव्हता.

लक्ष्मी तोमर बदरवास भागात ब्यूटी पार्लर चालवत होती. मात्र खरेदीच्या निमित्ताने तिची गुणा भागात ये-जा होती. या काळात संजयशी तिची ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि अनैतिक संबंध घडू लागले. लक्ष्मी घटस्फोटित होती. मात्र तिने संजयशी लग्न करण्याची तयारी दाखवली. संजयला आपल्या कुटुंबाच्या मर्जीप्रमाणे लग्न करायचं होतं. त्यामुळे तो लक्ष्मीसोबत दुरावा वाढवत होता.

लग्नाचा तगादा लावल्याने हत्येची कबुली

लक्ष्मीचा तगादा वाढत चालल्याने अखेर त्याने तिच्या हत्येचा कट रचला. बदरवासला जाऊन त्याने लक्ष्मीला गुण्याला येण्यास तयार केलं. तिला लग्न करण्याचं खोटं आमिष दाखवलं. तीही संजयच्या खोटं बोलण्याला फसली. 30 एप्रिलला अर्ध्या रस्त्यातच त्याने लक्ष्मीची गळा दाबून हत्या केली. तिचा मृतदेह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वर रस्त्याशेजारील झाडीत फेकून दिला. मात्र पोलिसांनी चातुर्याने तपास करत अखेर त्याला बेड्या ठोकल्याच.

संबंधित बातम्या :

63 वर्षीय डॉक्टर पतीची हत्या, 61 वर्षीय प्रोफेसर पत्नीला अटक

“खडकवासला जवळ गाडी लावून आत्महत्या करतोय, गाडी विकून येणारे पैसे आईला द्या”

(Groom arrested while getting ready for Haldi Ceremony of Wedding for Girlfriend Murder)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.