AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumai Crime : मुंबईत मध्यरात्री चाकू हल्ला, एकजण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचारासाठी….

नालासोपाऱ्यात मध्यरात्री चाकू हल्ला, रात्रभर सोपारा गावात तणावाचे वातावरण, गंभीर जखमीला...

Mumai Crime : मुंबईत मध्यरात्री चाकू हल्ला, एकजण गंभीर जखमी,  रुग्णालयात उपचारासाठी....
Image Credit source: Google
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jan 31, 2023 | 7:41 AM
Share

नालासोपारानालासोपाऱ्यात (Nalasopara) मध्यरात्री चाकू हल्ला करण्यात आल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गंभीर जखमीला रुग्णालयात (Mumbai Hospital)दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी (Nalasopara police) पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमी झालेल्या व्यक्तीवरती उपचार सुरु आहेत. चाकू हल्ला झाल्यामुळे सोपारा गावात रात्रभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या परिसरात रात्रभर पोलिसांची गस्त होती. कारण दोन गटातील वादामुळे चाकू हल्ला झाला आहे.

नालासोपारा पश्चिम सोपारा गावात इसमावर मध्यरात्री चाकूने हल्ला झाला. त्यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. मुसावीर दायर असे जखमी इसमाचे नाव असून, त्याला मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे. मस्जिदच्या ट्रस्टवर कोणी राहायचे यावरून झालेल्या वादातून हा चाकू हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत गैरकायद्याची मंडळी जमवून, प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी 5 जणांवर नालासोपारा पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल करून 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इम्रान खान असे एका आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत अन्य 4 जनावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मस्जिद ट्रस्ट वरून वाद झाला असल्याने रात्रभर सोपारा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच