Govinda Injured : दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत दिवसभरात 78 गोविंदा जखमी, 11 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु

| Updated on: Aug 19, 2022 | 8:31 PM

मुंबईत दिवसभरात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या अपघातात आतापर्यंत 78 गोविंदा जखमी झाले आहेत. सर्व जखमी गोविंदांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार करण्यात आले.

Govinda Injured : दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत दिवसभरात 78 गोविंदा जखमी, 11 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : राज्यात आज दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दोन वर्षे कोरोनामुळे सण-उत्सवांवर निर्बंध होते. यंदा सर्व निर्बंध हटवल्यामुळे गोविंदा पथकांमध्ये खूप उत्साह पहायला मिळाला. मुंबईत दिवसभरात विविध ठिकाणी दहीहंडी (Dahi Handi) उत्सवादरम्यान घडलेल्या अपघातात आतापर्यंत 78 गोविंदा जखमी (Injured) झाले आहेत. सर्व जखमी गोविंदांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार (Treatment) करण्यात आले. यापैकी 67 गोविंदांना उपचार करुन घरी सोडण्यात आले तर 11 जण रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयात दाखल गोविंदावर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने कोणत्याही अनुचित घटनेची नोंद नाही.

पालिका रुग्णालयांत जखमी गोविंदांवर उपचार

जेजे रुग्णालय – 2
सेंट जॉर्ज रुग्णालय – 3
जीटी रुग्णालय – 11
नायर रुग्णालय – 9
केईएम रुग्णालय – 17
सायन रुग्णालय – 7
ट्रॉमा केअर रुग्णालय – 2
कूपर रुग्णालय – 6
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली – 1
व्ही. एन. देसाई रुग्णालय – 6
राजावाडी रुग्णालय – 10
पोद्दार रुग्णालय – 4

जांबोरी मैदानात तिसऱ्या थरारावरुन पडून गोविंदा बेशुद्ध

जांबोरी मैदानात तिसऱ्या थरावरुन पडल्याने एक गोविंदा बेशुद्ध झाला आहे. बेशुद्ध अवस्थेत या गोविंदाला केईएम रुग्णालयात नेण्यात आले आहे. करण सावंत (22) असे या गोविंदाचे नाव आहे. जंबोरी मैदानात भाजपा तर्फे दही हंडी आयोजित करण्यात आली होती. यावेळी थर लावताना ही दुर्घटना घडली.

हे सुद्धा वाचा

माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी घेतली जखमी गोविंदांची भेट

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात दाखल जखमी गोविंदांची भेट घेत विचारपूस केली. जखमी गोविंदांचा उपचार आणि इतर माहिती संदर्भात त्यांनी माहिती घेतली. सहकार्य करणाऱ्या मंडळाचे जे सदस्य आहेत, त्यांनाही किशोरीताई यांनी मार्गदर्शन केलं. रुग्णांना कुठलीही गैरसोय होणार नाही. सुदैवाने कोणीही गंभीर जखमी नाही. यंदा कमी गोविंदा जखमी झाले. केईएममध्ये जखमी गोविंदांवर मोफत उपचार सुरू आहेत. हिंदू परंपरा नाक्यानाक्यावर दिसते, अशी प्रतिक्रिया यावेळी किशोरी पेडणेकर यांनी दिली. लहान मुलांना गोविंदा म्हणून वापरण्यास माझाही आक्षेप आहे. यावर बंदी आणली होती. मात्र दोन वर्षांनी दहीहंडी होत असल्याने उत्साह अधिक असल्याचेही पोडणेकर म्हणाल्या. (78 Govinda injured during Dahi Handi festival in Mumbai during the day)