महानायक अमिताभ बच्चन यांची 14 कोटी रुपयांची Rolls Royce का खातेय पोलीस स्टेशनमध्ये धूळ

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची 14 कोटींची रोल्स रॉइस कार सध्या पोलीस ठाण्यात धूळखात पडली असल्याचे समोर आले आहे. तुम्हाला ही बातमी वाचून आश्चर्य वाटेल पण होय हे खरं आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांची 14 कोटी रुपयांची Rolls Royce का खातेय पोलीस स्टेशनमध्ये धूळ
अमिताभ बच्चन यांची आलिशान गाडी पोलीस ठाण्यात धूळखात
Image Credit source: social
| Updated on: Dec 01, 2022 | 8:12 PM

मुंबई : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागल्याचे वृत्त कधीच ऐकले नसेल. अमिताभ यांना मोठ्या स्क्रीनवर पोलीस अधिकारी पाहण्यातच असंख्य चाहत्यांना धन्यता वाटलेली आहे. मग अमिताभ यांची अत्यंत महागडी अशी 14 कोटींची आलिशान गाडी पोलीस ठाण्याच्या आवारात उभी का? असा प्रश्न सध्या अनेकांना सतावत आहे. कारण अमिताभ यांची आलिशान गाडी कित्येक महिन्यांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात धूळ खात पडली आहे. यामागचे कारण उजेडात आल्यानंतर मात्र सर्वांनाच मोठा धक्का बसत आहे.

काय आहे प्रकरण?

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची 14 कोटींची रोल्स रॉइस कार सध्या पोलीस ठाण्यात धूळखात पडली असल्याचे समोर आले आहे. तुम्हाला ही बातमी वाचून आश्चर्य वाटेल पण होय हे खरं आहे. ही जेवढी आश्चर्य कारक आहे तेवढीच या गाडीची पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्याची कहाणी रंजक आणि धक्कादायक आहे.

2019 ला विकली होती कार

बिग बीं नी ही कार 2019 मध्येच धन्नासेठ नामक व्यक्तीला 14 कोटींना विकली होती. मात्र अद्याप कार विकत घेणाऱ्याने कागदोपत्री ती कार आपल्या नावे न करता अमिताभ यांच्याच नावे ठेवली आहे. यामुळे कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कार पोलिसांनी जप्त केली आहे.

विधू विनोद चोप्रांनी गिफ्ट दिली होती कार

ही कार अमिताभ बच्चन यांना प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी त्यांच्या ‘एकलव्य’ चित्रपटाच्या रिलीजनंतर भेट दिली होती. ही कार बिग बीं नी 2019 मध्ये विकली.

वाहन विक्रीची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर वाहनाच्या कागदपत्रांमध्ये वाहन मालकाचे नाव प्रविष्ट केले जाते. पण कार खरेदी केल्यानंतर कारच्या नवीन मालकाने कारच्या कागदपत्रांमध्ये आवश्यक ते बदल केले नाहीत.

अशी अडकली कार कायदेशीर कारवाईत

एके दिवशी मुंबई पोलिसांच्या एका हवालदाराने तपासणीदरम्यान या गाडीच्या नवीन मालकाकडून कागदपत्रे मागितली. कागदपत्रे तपासल्यानंतर मालक म्हणून अमिताभ बच्चन यांचे नाव दिसले. यानंतर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस हवालदाराने गाडी उचलून पोलीस ठाण्यात आणली.

कारचा मालक दुसरा व्यक्ती आहे आणि कागदपत्रांमध्ये अमिताभ यांचे नाव असल्याने प्रकरण क्लिष्ट बनले आहे. यामुळे बऱ्याच दिवसांपासून ही गाडी पोलीस ठाण्यात धूळखात पडली आहे.