AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईत बिहार स्टाईल हत्याकांड, बाईकवरून आले, अंधाधूंद गोळ्या झाडल्या अन् पसार झाले; अनेकांसमोरच बिल्डरची हत्या

नवी मुंबईच्या नेरूळ येथे सावजीभाई पटेल या बिल्डरची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दोन तरुणांनी बाईकवरून येऊन ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

नवी मुंबईत बिहार स्टाईल हत्याकांड, बाईकवरून आले, अंधाधूंद गोळ्या झाडल्या अन् पसार झाले; अनेकांसमोरच बिल्डरची हत्या
builder shot deadImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 16, 2023 | 7:12 AM
Share

नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ परिसरात काल एका बिल्डरची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. दोन इसम बाईकवरून आले. अन् कारमध्ये बसलेल्या बिल्डरवर अंधाधूंदपणे गोळ्या झाडून पसार झाले. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बिल्डरचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे असंख्य लोकांसमोरच या बिल्डरची हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ज्या राजरोसपणे हत्या केल्या जातात तसाच प्रकार घडल्याने नवी मुंबईत दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

सावजीभाई पटेल असं या बिल्डरचं नाव आहे. नेरूळच्या सेक्टर सहामध्ये ही घटना घडली. काल संध्याकाळी पावणे पाच वाजता पोलीस कंट्रोल रुमला हत्या झाल्याचा फोन आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी साडेचार ते पावणे पाचच्या सुमारास ही हत्या झाली. हा बिल्डर कारमध्ये बसलेला असतानाच दोन तरुण बाईकवर आले आणि त्यांनी बिल्डरला गोळ्या घातल्या आणि पसार झाले. यावेळी या परिसरात अनेक लोक होते. या लोकांनी नेमकं काय घडलं याची माहिती पोलिसांना दिली.

कारमध्ये बॉडी मिळाली

पोलिसांना कारमध्ये सावजीभाई पटेल यांची बॉडी मिळाली आहे. पटेल यांना गोळ्या घातल्याचं निष्पन्न झालं आहे. कारमध्ये तीन निकामी काडतुसेही मिळाली आहेत. पोलिसांनी पंचनामा तयार केला आहे. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक छडा लावण्यासाठी पोलीस पटेल यांच्या कुटुंबीयांचाही जबाब घेत आहेत. पटेल यांना कुणाच्या धमक्या आल्या होत्या का? अलिकडच्या काळात त्यांचं कुणाशी भांडण झालं होतं का? काही वाद होते का? आदी मुद्द्यांवरून घटनेचा तपास केला जात आहे. तसेच या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही पोलीस तपासणार असल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

जमिनीच्या वादातून हत्या?

सावजीभाई पटेल हे रिअल इस्टेटशी संबंधित आहेत. जमिनीच्या वादातून पटेल यांची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस त्यानुषंगानेही तपास करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!