वसईत चोरांचा सुळसुळाट, एकाच रात्री 4 इमारतीत घरफोड्या, चोर सीसीटीव्हीत अचूकपणे कैद

| Updated on: Aug 09, 2021 | 12:11 AM

वसई पश्चिमेकडील चोऱ्यांचे सत्र काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. वसईच्या समता नगर परिसरात 4 ऑगस्टला एकाच रात्री चार ठिकाणी चोरी झाल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.

वसईत चोरांचा सुळसुळाट, एकाच रात्री 4 इमारतीत घरफोड्या, चोर सीसीटीव्हीत अचूकपणे कैद
वसईत चोरांचा सुळसुळाट, एकाच रात्री 4 इमारतीत घरफोड्या, चोर सीसीटीव्हीत अचूकपणे कैद
Follow us on

वसई (पालघर) : वसई पश्चिमेकडील चोऱ्यांचे सत्र काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. वसईच्या समता नगर परिसरात 4 ऑगस्टला एकाच रात्री चार ठिकाणी चोरी झाल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. विशेष म्हणजे चोरट्यांची चोरी सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

चोरट्यांनी 4 ऑगस्टला विशाल व्यू बिल्डींगच्या तळमजल्यावर असणाऱ्या घराचा टाळा फोडला. या फ्लॅटमध्ये लहान मुलांची नर्सरी आहे. तिथे चोरट्यांची हाती काहीच लागलं नाही. त्यानंतर चोरट्यांनी शेजारी असलेल्या सरोज बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावरील ज्योती गूलीयाना यांच्या घराचा टाळा फोडला. ज्योती गूलीयाना यांच्या घरातून देवाच्या मुर्त्या आणि चांदीच्या काही वस्तू चोरीला गेल्या आहेत.

चोरांनी दिवसा पाहणी केला असल्याचा संशय

चोरट्यांनी यानंतर सरोज इमारतीच्या बाजूला असणारी सरोज महल या इमारती देखील तळमजल्यावरील अयाझ नथवानी यांच्या घराचा टाळा तोडून चोरी केली. चोरट्यांनी घरातील काही वस्तू चोरी केल्या. विशेष म्हणजे ज्या घरांमध्ये चोरी झाली आहे त्या घरांमध्ये घरातील कुणीही सदस्य नव्हते. संबंधित रहिवासी घरी आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. चोरीच्या घटना पाहता चोरांनी दिवसा या परिसराची पाहणी केला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

पोलिसांचा तपास सुरु

विशेष म्हणजे वसईत याआधी देखील घरफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. चोरीच्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज याआधी देखील पोलिसांच्या आधी लागले आहे. पण या घटनांचा उलगडा करण्यात पोलीस अयशस्वी ठरले आहेत. आता या सीसीटीव्हीच्या आधारे तरी पोलीस चोरांना पकडतील, अशी नागरिकांना आशा आहे.

हेही वाचा :

इथून सोसायटीच्या महिला-मुली जातात, इथे लघवी का करता? जाब विचारणाऱ्याची दोन नराधमांकडून निघृण मारहाण

दुकानाचं शटर कापत असताना कटावणी खाली पडली, जोराचा आवाज, दरोड्याचा प्रयत्न फसला