दुकानाचं शटर कापत असताना कटावणी खाली पडली, जोराचा आवाज, दरोड्याचा प्रयत्न फसला

कल्याण पश्चिमेतील बैलबाजार चौकात ठाकूर मेडिकल स्टोअर आहे. हे मेडिकलेच मोठे दुकान आहे. याच दुकानात चोरीची घटना घडत असताना चोर रंगेहात पकडले गेले.

दुकानाचं शटर कापत असताना कटावणी खाली पडली, जोराचा आवाज, दरोड्याचा प्रयत्न फसला
दुकानाचं शटर कापत असताना कटावणी खाली पडली, जोराचा आवाज, दरोड्याचा प्रयत्न फसला

कल्याण (ठाणे) : चोरी करायला चोर आले. त्यांचा निशाणा एका मोठ्या मेडिकल स्टोअर होता. चोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्याच्या हातातील कटावणी पडली आणि दोन्ही चोरांना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडले. संबंधित घटना ही कल्याणमध्ये घडली आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पश्चिमेतील बैलबाजार चौकात ठाकूर मेडिकल स्टोअर आहे. हे मेडिकलेच मोठे दुकान आहे. याच दुकानात चोरीची घटना घडत असताना चोर रंगेहात पकडले गेले. दोन चोरांनी आज पहाटे या मेडिकलची पाहणी केली. दोघे चोरीसाठी मेडिकलच्या दिशेने जात असताना दोघांपैकी एकाच्या हाती कटावणी होती. त्यांनी शटर कापायला सुरुवात केली. या दरम्यान कटावणी जोरात जमीनीवर खाली पडली.

नागरिकांकडून पोलिसांना माहिती

कटावणी पडल्याचा जोरदार आवाज एकून बाजूच्या सोसायटीतील काही नागरीकांनी दुकानाच्या दिशेला धाव घेतली. यावेळी त्यांना धक्काच बसला. दोन चोर कटावणीने शटर कापत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. नागरीकांनी त्वरीत कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना याबाबत माहिती दिली. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी विजय भालेराव आणि अन्य काही पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांनी संयमाने सगळा प्रकार बघितला. त्यानंतर मोठ्या शिताफीने दोन्ही चोरट्यांना पकडलं. आनंद सिंग आणि यासीर खान अशी या दोन चोरट्यांची नावे आहेत. हे दोघे वसईचे राहणारे आहेत. या चोरट्यांनी अजून किती दुकाने फोडली आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

सुरक्षा कंत्राटदाराने महिलांना छळलं, मनसेने भर रस्त्यात चोपचोप चोपलं !

इथून सोसायटीच्या महिला-मुली जातात, इथे लघवी का करता? जाब विचारणाऱ्याची दोन नराधमांकडून निघृण मारहाण

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI