अभिजीत दीपकेंना मोठा हादरा… पोलिसांची सर्वात मोठी अ‍ॅक्शन, थेट 500… मानवाधिकार आयोगाची एन्ट्री

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील मुंबईतील शिवाजी पार्क येथील सीजेपी आंदोलनाप्रकरणी आयोजकांसह ४००-५०० अज्ञात समर्थकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आंदोलनात अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले होते.

अभिजीत दीपकेंना मोठा हादरा... पोलिसांची सर्वात मोठी अ‍ॅक्शन, थेट 500... मानवाधिकार आयोगाची एन्ट्री
CJP protest Mumbai
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 6:00 PM

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात मुंबईच्या शिवाजी पार्कात काल शुक्रवारी सीजेपीचं आंदोलन झालं. या आंदोलनप्रकरणी आयोजकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी आयोजकांसह तब्बल 400-500 अज्ञात सीजेपी समर्थक आणि आंदोलकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कालच्या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसतानाही गुन्हा दाखल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, यावर अद्याप सीजेपीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.

पोलिसांच्या मते, शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात क्राइम नंबर 515/26 दाखल करण्यात आला आहे. बीएनएसच्या कलम 189, 223 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37(1)(3)/135 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे सीजेपच्या आंदोलनाचे आयोजक आणि 400-500 अज्ञात CJP समर्थक आणि आंदोलकांच्या विरोधात दाखल करण्यात आले आहेत.

Loading...

काल 2 ऑक्टोबर रोजी मुंबई सार्वजनिक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात अल्पवयीन मुलांचा समावेश होता. तसेच त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. याची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली होती. आयोगाने मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993चे कलम 12 च्या अंतर्गत कारवाईही केली होती.

तक्रार दाखल

सेवा न्याय उत्थान फाऊंडेशनचे हेड ऑफ इंटरवेन्शन सतीश वैद यांनी ही तक्रार दाखल केली होती. आयोगाने मुंबई पोलीस आयुक्त, MeitY, भारत में X Corp. चे ग्रिवान्स ऑफिसर आणि महाराष्ट्र महिला आणि बाल विकास विभागाच्या प्रधान सचिवांना याबाबत नोटीस जारी केलं होतं. आयोगाने पोलिसांना फोटो, व्हिडीओ आणि इतर डीजिटल पुराव्यांची चौकशी करून कॉग्निजेबल ऑफेन्स मिळाल्यावर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते.

अल्पवयीन मुले कोणत्या परिस्थितीत आंदोलनात सामील झाले आणि आयोजक, संयोजक आणि त्यांच्यासोबतच्या प्रौढांची याबाबत काय भूमिका होती, याचा तपास करण्याचे निर्देशही आयोगाने दिले होते. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना एक आठवड्याच्या आत कृती अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या कारवाईबाबत अद्याप अभिजीत दीपके किंवा त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us