इराणी टॅल्कम पावडरचा कंटेनर उरणच्या बंदरावर उतरवला, कस्टमच्या धाडीनंतर धक्कादायक सत्य समोर

| Updated on: Jul 02, 2021 | 8:41 PM

Custom Department | हेरॉईनची मोठी खेप सागरी मार्गाने भारतामध्ये आणली जाणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानंतर या हेरॉईनचे मुंबई आणि दिल्लीत वितरण करण्यात येईल, अशीही खबर मिळाली होती.

इराणी टॅल्कम पावडरचा कंटेनर उरणच्या बंदरावर उतरवला, कस्टमच्या धाडीनंतर धक्कादायक सत्य समोर
टॅल्कम पावडर
Follow us on

मुंबई: उरणच्या जेएनपीटी बंदराच्या परिसरात सीमाशुल्क विभागाने (Custom Department) केलेल्या कारवाईत एक धक्कादायक प्रकार समोर आला. याठिकाणी टॅल्कम पावडरचा साठा असलेला एक कंटेनर ठेवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर या कंटेनरमध्ये 290 किलो हेरॉईन हा अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एकच मोठी खळबळ उडाली आहे. महसूल गुप्तवार्ता संचलनालय (DRI) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. (Customs department seized heroin drug at JNPT port)

प्राथमिक माहितीनुसार, हेरॉईनची मोठी खेप सागरी मार्गाने भारतामध्ये आणली जाणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानंतर या हेरॉईनचे मुंबई आणि दिल्लीत वितरण करण्यात येईल, अशीही खबर मिळाली होती. या माहितीच्याआधारे कस्टम विभागाने जेएनपीटी बंदराच्या परिसरात कारवाई केली.

यावेळी इराणमधील टॅल्कम पावडरचा एक कंटेनर जेएनपीटी बंदरात उतरवण्यात आल्याचे कस्टम विभागाच्या निदर्शनास आले. हा कंटेनर सीएफएसमध्ये (कंटेनर फ्रेट स्टेशन्स) ठेवण्यात आला होता. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा कंटेनर उघडून तपासणी केली असता त्यामध्ये अफगाणिस्तानमधून आणलेले 290 किलो हेरॉईन आढळले. हा सर्व साठा कस्टम विभागाकडून जप्त करण्यात आला असून पुढील चौकशी सुरु आहे.

संबंधित बातम्या:

14 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी, लॉजवर नेऊन 5 तरुणांचा बलात्कार

खबऱ्याने माहिती दिली, कर्जत पोलिसांनी ट्रॅप लावला, दूध भेसळीची लाखो रुपयांची पावडर जप्त!

गोठ्यात आणि कारमध्ये लाखोंची बनावट दारू लपवली, पोलिसांना खबर लागली आणि…

(Customs department seized heroin drug at JNPT port)