AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Accident : एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले अपघातातून थोडक्यात बचावले! 7 गाड्यांचा विचित्र अपघात

Bharat Gogawale Accident : या अपघाताबद्दल खुद्द भरत गोगावले यांनीही माहिती दिली.

Mumbai Accident : एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले अपघातातून थोडक्यात बचावले! 7 गाड्यांचा विचित्र अपघात
अपघातग्रस्त वाहन...Image Credit source: Twitter Video Grab
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jul 11, 2022 | 1:14 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद म्हणून ज्यांनी नेमणूक करण्यात आली, ते भरत गोगावले (Bharat Gogawale) थोडक्यात अपघातातून बचावले आहे. महाडचे आमदार असलेल्या भरत गोगावले यांच्या गाडीचा मुंबईत अपघात झाला. मुंबईत मंत्रालयाच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यावेळी सात गाड्या एकमेकांना धडकल्या आणि ही दुर्घटना घडली. या अपघातमध्ये भरत गोगावले यांच्या फॉर्च्युनर गाडीला मागून पुढून असा दोन्ही कडून मार बसला. यामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालंय. मात्र हा अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. मुंबईच्या ईस्टर्न फ्री-वेवर (Mumbai Eastern Freeway) सात गाड्या एकमेकांना धडकल्या. यात भरतशेट गोगावले यांच्या गाडीसह अन्य सहा गाड्यांचंही नुकसान झालं. मुंबई ईस्टर्न फ्री-वेवरवरुन सुसाट वेगानं गाड्या जात असतात. अचानक चुकून एखादं वाहनं थांबलेलं असेल आणि मागूनही वेगानं गाड्या येत असतील तर मोठी अपघात (Mumbai Accident News) होण्याची भीती असते. यावेळीही मुंबईत ईस्टर्न फ्री-वेवर नेमका असाच अपघात झाल्याचं पाहायला मिळालंय.

वाहनांची एकमेकांना ठोकर

भरत गोगावले यांच्या एम एच 06 बी व्ही 5457 या फॉर्च्युनर गाडीचं बोनेट या अपघातात चक्काचूर झालं. तर गाडीच्या मागच्या बाजूलाही दुसऱ्या वाहनानं ठोकर दिली. समोरील बाजूला असलेल्या वाहनाला धडकल्यानं फॉर्च्युनर गाडीच्या दर्शनी भागाचं नुकसान झालंय. तर एमएच 02 ईएच 4604 नंबरच्या दुसऱ्या एका व्हॅगेनार कारचं या अपघातात मोठं नुकसान झालंय. फॉर्च्युनरला धडक दिल्यानं व्हॅगेनार कारला फटका बसला. अचानक गाडीचा वेग नियंत्रित करता न आल्यानं व्हॅगेनार चालकाने फॉर्च्युनरला मागून ठोकर दिली.

अपघातानंतर काय म्हणाले गोगावले?

दरम्यान, या अपघाताबद्दल खुद्द भरत गोगावले यांनीही माहिती दिली. या अपघातामध्ये कुणालाही मार लागला नाही. सात गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि हा अपघात घडला. पण सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गाड्यांचं नुकसान झालं असतं, तरी सगळे सुखरुप आहे, अशी माहिती गोगावले यांनी दिली आहे. मंत्रालयच्या दिशेने जात असताना सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

एकनाथ शिंदे गटाचे सर्वच आमदार यांचं आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष लागलं होतं. मात्र तूर्तास ही सुनावणी आणि निलंबन टळलं आहे. आता खंडपीठापुढे निलंबनाच्या याचिकेवर सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवरील निलंबनाची कारवाई होणार नसून सुप्रीम कोर्टाच्या पुढील सुनावणीची तारीख नेमकी काय लागते आणि त्यामध्ये काय होतं, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार