AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक… धक्कादायक… चक्क रुग्णवाहिकेतून दारू आणली; बड्या ब्रँडच्या दारू अखेर…

राज्य उत्पादक शुल्काने केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे दारु तस्करांचे अक्षरश: धाबे दणाणले आहेत. या तस्करांना पकडण्यासाठी जोरदार मोहीम सुरु आहे. विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्काने नुकतंच केलेल्या एका कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दारुचे तस्कर हे चक्क रुग्णवाहिकेतून गुजरातच्या दादरा नगर हवेली येथून दारुची तस्करी करत असल्याचं उघड झालं आहे.

धक्कादायक... धक्कादायक... चक्क रुग्णवाहिकेतून दारू आणली; बड्या ब्रँडच्या दारू अखेर...
| Updated on: Dec 14, 2023 | 8:45 PM
Share

विजय गायकवाड, Tv9 मराठी, पालघर | 14 डिसेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राज्य उत्पादन शुल्काकडून कारवाईंचा सध्या धडाकाच सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्काकडून वारंवार मोठमोठ्या कारवाई करण्यात आल्याची बातमी सातत्याने समोर येताना दिसत आहे. आता देखील अशीच एक घटना समोर आली आहे. आरोपी थेट गुजरात राज्यातून महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत दारुची बेकायदेशीरपणे तस्करी करत होते. आरोपी इतके शातिर की ते चक्क रुग्णवाहिकेतून लाखो रुपयांच्या दारुची तस्करी करत होते. त्यांचं अशाप्रकारे तस्करी करण्याचं कृत्य किती दिवसांपासून सुरु होतं याचा अंदाज लावता येणं कठीण आहे. पण त्यांची ही चोरी आता पकडी गेली आहे. राज्य उत्पादन शुल्काने असं कृत्य करणाऱ्या आरोपींची चोरी पकडली आहे. पण आरोपींच्या नांग्या ठेचण्यात राज्य उत्पादन शुल्काला पूर्णपणे यश येऊ शकलं नाही. पण या कारवाईमुळे तस्करांचे धाबे नक्कीच दणाणले आहेत. राज्य उत्पादन शुल्काच्या हाती आरोपींची रुग्णवाहिका आणि त्यामधील 9 लाखांची दारु लागली आहे.

नेमकं प्रकरण काय?

गुजरात राज्यातील दादरा नगर हवेली येथून, मुंबईला दारू आणण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पालघर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने याचा पर्दाफाश केला आहे. उत्पादन शुल्क विभागाने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोरच्या हद्दीतील स्वागत पेट्रोल पंपावर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेवर छापा मारून याचा भांडाफोड केला आहे. या छाप्यात रुग्णवाहिकेसह 9 लाख 34 हजार 120 रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

रुग्णवाहिकेचा चालक फरार

विशेष म्हणजे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकताच रुग्णवाहिकेचा चालक घटनास्थळावरून संधी साधून पळून गेला. पोलिसांनी त्याला फरार घोषित केलं आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (अ), (ई), 81, 83, 98, 103, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आणि उत्पादन शुल्काच्या कर्मचाऱ्यांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

बड्या ब्रँडच्या दारूची तस्करी

दादरा नगर हावेली आणि इतर राज्यातून रुग्णवाहिकेतून दारूची तस्करी होते, अशी बातमी पालघर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकातील जवानांना मिळाली होती. पथकाने आज मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रुग्णवाहिकेवर छापा टाकून तपासणी केली असता, रुग्णवाहिकेत रुग्णासाठी बनविण्यात आलेले लाकडी बॉक्स, त्यावरील स्ट्रेचरच्या खाली रॉयल चॅलेंज, आय बी, आणि बियरच्या असा दारूचा साठा सापडला.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.