AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ, ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

शरद अग्रवाल यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागून जमिनी बळजबरीने नावावर करण्यात आल्याच्या आरोपाखाली परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाण्यातील कोपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ, ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सोमवारी हजर राहण्याचे चांदिवाल आयोगाचे आदेश
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 26, 2021 | 8:28 AM
Share

ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत. परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीने परमबीर सिंग यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

परमबीर सिंह यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप शरद अग्रवाल यांनी केला आहे. शरद अग्रवाल यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागून जमिनी बळजबरीने नावावर करण्यात आल्याच्या आरोपाखाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्यासोबत संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि डीसीपी पराग मणेरे असे सहआरोपी आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक फूलपगारे करत आहेत.

खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा

याआधी, परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण (DCP Akbar Pathan) यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा श्याम सुंदर अगरवाल यांनी केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे.

परमबीर सिंग आणि अनिल देशमुख प्रकरण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहिना 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत ही समिती चौकशी करणार आहे.

संबंधित बातम्या  

ईडीची पहिली मोठी कारवाई, अनिल देशमुखांची 4 कोटींची संपत्ती जप्त

परमबीर सिंग यांच्यापाठोपाठ आता वरिष्ठ पोलिसांवर खंडणीचा गुन्हा, कुणाकुणाची नावं?

(Extortion case registered against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh in Thane)

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर