वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव, तिघांना बेड्या, कल्याणमध्ये वनविभागाची मोठी करवाई

कल्याणमधील एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो आणि वन विभाग कल्याण शाखेने छापा टाकला. यावेळी 250 इंद्रजाल (काळा समुद्री शेवाळ) आणि 80 जोडी घोरपडीचे अवयव आढळले.

वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव, तिघांना बेड्या, कल्याणमध्ये वनविभागाची मोठी करवाई
वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव, तिघांना बेड्या, कल्याणमध्ये वनविभागाची मोठी करवाई
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 12:47 AM

कल्याण (ठाणे) : कल्याणमधील एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो आणि वन विभाग कल्याण शाखेने छापा टाकला. यावेळी 250 इंद्रजाल (काळा समुद्री शेवाळ) आणि 80 जोडी घोरपडीचे अवयव आढळले. वन विभागाने सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वनविभागाकडून वास्तू सल्लागार महिला गीता जाखोटिया, तिच्या कार्यालयातील कर्मचारी नवनाथ घुगे आणि अक्षय देशमुख अशा तिघांना अटक केली आहे. या वस्तू इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यालयात का आणल्या? याचा तपास सुरु असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पश्चिमेकडील संतोषी माता रोडवरील मॅक्सी ग्राउंडसमोरील इमारतीत असलेल्या गीता जखोटिया या महिलेच्या वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात दुर्मिळ व बाळगण्यास बंदी असलेली इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव असल्याची माहिती वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरोला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो विभागीय उपसंचालक योगेश वारकड, गजेंद्र हिरे, आणि वन विभागाचे आर एन चन्ने यांच्या पथकाने गुरुवारी (16 सप्टेंबर) सायंकाळी धाड टाकली.

तिघांना बेड्या, दोन दिवसांची पोलीस कोठडी

यावेळी या कार्यालयात 250 काळ्या समुद्र शेवाळाचे तुकडे म्हणजेच इंद्रजाल आणि 80 जोड्या घोरपडीचे अवयव आढळून आले. या पथकाने मुद्देमालासह तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत सुनावली आहे. या वस्तूचा साठा करण्यास किंवा या वस्तू जवळ बाळगण्यास कायद्याने बंदी असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर या वस्तूंचा साठा का करण्यात आला होता? याची चौकशी सुरु असल्याचे वनविभागाचे अधिकारी चन्ने यांनी सांगितले.

काळी जादूसाठी इंद्रजाल, घोरपडीच्या अवयवांचा वापर

दरम्यान, इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव घरात, कार्यालयात, दुकानात ठेवल्यास सुख-शांती, चांगलं आरोग्य आणि लक्ष्मी घरात नांदते अशी अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेपोटी या वस्तू बाळगल्या जात असून काळी जादू करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. तर आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील या वस्तू वापरल्या जातात. मात्र या वस्तू जवळ बाळगण्यास किंवा त्यांची विक्री करण्यास वन्यजीव कायदा 1972 अन्वये मज्जाव करण्यात आला आहे.

काळ्या जादूसाठी पोटच्या मुलीची हत्या, स्वत:लाही संपवलं

दरम्यान, काळी जादू किंवा जादूटोणा या गोष्टी फक्त भारतातच नाही तर जगभरात केल्या जातात. नुकतच काही दिवसांपूर्वी रशियातील एका महिलेने काळ्या जादूसाठी पोटच्या मुलीचा नरबळी दिल्याची घटना उघडकीस आली होती. संबंधित घटना ही रशियातील रोस्तोव-ऑन-डॉन या भागात समोर आली आहे. मृतक महिलेचं एलिझावेता त्सारेवस्काया असं नाव आहे. या मृतक महिलेने काळी जादू शिकण्यासाठी स्वत:च्या पोटच्या मुलीचा, घरातील पाळीव मांजरेचा जीव घेतला. त्यानंतर स्वत: जीव दिला. या घटनेवर जगभरात चर्चा झाली.

हेही वाचा :

विवस्त्र होऊन दगडफेक, गाड्या अडवल्या, रुग्णवाहिकेचा ताबा घेतला, पुण्यात माथेफिरुचा धिंगाणा

‘आयुष्याशी खूप त्रस्त झालोय’, पत्नीला संपवत तरुणाची आत्महत्या, अवघ्या 11 दिवसांचं बाळ पोरकं

काळी जादू शिकण्याच्या नादात पोटच्या मुलीला संपवलं, पोलिसांनी दरवाजा उघडताच तिचाही नग्नावस्थेत मृतदेह

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.