काळी जादू शिकण्याच्या नादात पोटच्या मुलीला संपवलं, पोलिसांनी दरवाजा उघडताच तिचाही नग्नावस्थेत मृतदेह

एका महिलेने काळी जादू शिकण्यासाठी आपल्या पोटच्या मुलीचा बळी घेतला. त्यासोबत घरातील मांजरीचाही बळी घेतला. त्यानंतर स्वत:चा देखील जीव दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

काळी जादू शिकण्याच्या नादात पोटच्या मुलीला संपवलं, पोलिसांनी दरवाजा उघडताच तिचाही नग्नावस्थेत मृतदेह
चंद्रपूरमधील वाढत्या जादूटोणा तंत्र-मंत्र घटना रोखण्यासाठी प्रशासन सरसावले

मॉस्को (रशिया) : काही घटना प्रचंड भयानक, विचित्र आणि भीषण असतात. त्या कल्पनेच्या पलीकडच्या असतात. त्यामुळे अशा घटनांची जगभरात चर्चा होते. रशियात देखील अशीच काहिशी एक घटना समोर आली आहे. या घटनेने अनेकांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. एका महिलेने काळी जादू शिकण्यासाठी आपल्या पोटच्या मुलीचा बळी घेतला. त्यासोबत घरातील मांजरीचाही बळी घेतला. त्यानंतर स्वत:चा देखील जीव दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काळी जादू करुन बऱ्याच गोष्टी आपल्या हातात याव्यात यासाठी तिचा अट्टहास होता. पण या काळ्या जादूच्या मोहात तिच्यासह तिच्या मुलीचा आणि घरातील मांजरीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलीस तर चक्रावलेच, पण जगभरात या घटनेवर चर्चा सुरु आहे.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही रशियातील रोस्तोव-ऑन-डॉन या भागात समोर आली आहे. मृतक महिलेचं एलिझावेता त्सारेवस्काया असं नाव आहे. या मृतक महिलेने काळी जादू शिकण्यासाठी स्वत:च्या पोटच्या मुलीचा, घरातील पाळीव मांजरेचा जीव घेतला. त्यानंतर स्वत: जीव दिला. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

पोलीसही चक्रावले

पोलिसांनी मृतक महिलेच्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. कारण त्यांनी घटनास्थळी जे पाहिलं ते खरंच भयानक होतं. पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा एलिझावेताचा नग्न मृतदेह तिच्या लहान मुलीच्या मृतदेहावर पडला होता. त्यांच्या जवळच घरातील मांजरीचा मृतदेह होता. तसेच त्यांच्या आजूबाजूला एका व्यक्तीचे चित्रे विखुरलेली होती. पोलिसांनी संबंधित व्यक्ती नेमका कोण? ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती व्यक्ती हा मृतक महिलेचा प्रियकर असल्याची माहिती समोर आली. महिलेच्या पतीनेच ही माहिती दिली.

मृतक महिलेच्या पतीकडून धक्कादायक माहिती

मृतक महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, एलिझावेता त्सारेवस्काया हिचा प्रियकर हा स्वत:ला काळ्या जादूचा तज्ज्ञ समजायचा. त्यानेच महिलेला काळ्या जादूचं वेळ लावलं. विशेष म्हणजे महिला ही आर्किटेक्ट आणि ड्रेस डिझायनर होती. ती एका ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरी देखील करत होती. पण काळी जादू शिकण्याच्या मोहापायी तिने नोकरी सोडली. स्वत:ला काळ्या जादूचा तज्ज्ञ मानणाऱ्या एका व्यक्तीसोबत तिचे प्रेमसंबंध सुरु होते. त्यानेच तिला काळ्या जादूचे आणखी वेड लावले, अशी माहिती पीडितेच्या पतीने पोलिसांना दिली.

हेही वाचा :

सहा वर्षांचा लेक ठरला प्रेमात अडथळा, सख्ख्या आईकडून प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या

बलात्काराच्या घटनेवर लोकं भडकली, रस्त्यावर मोठा गदारोळ आणि जाळपोळ, गर्दी नियंत्रणात न आल्याने पोलिसांकडून गोळीबार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI