सहा वर्षांचा लेक ठरला प्रेमात अडथळा, सख्ख्या आईकडून प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या

जिल्ह्यातील अंबड अंबड तालुक्यातील डावरगाव येथे राहणाऱ्या शीतल उघडे आणि नवनाथ जगधने यांच्यात विवाहबाह्य प्रेम संबंध होते. मात्र या प्रेम संबंधात शीतलचा सहा वर्षांचा मुलगा अडसर ठरत होता. त्यामुळे आईनेच मुलाला प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या हवाली केले.

सहा वर्षांचा लेक ठरला प्रेमात अडथळा, सख्ख्या आईकडून प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या
जालन्यात महिलेने प्रियकराच्या साथीने मुलाला संपवलं
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 2:48 PM

जालना : माताच मुलासाठी वैरीण ठरल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील अंबड येथे उघडकीस आली आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्या पोटच्या गोळ्याला आईनेच प्रियकराच्या मदतीने जीवे ठार मारल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी आरोपी मातेसह तिच्या प्रियकरालाही बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

जिल्ह्यातील अंबड अंबड तालुक्यातील डावरगाव येथे राहणाऱ्या शीतल उघडे आणि नवनाथ जगधने यांच्यात विवाहबाह्य प्रेम संबंध होते. मात्र या प्रेम संबंधात शीतलचा सहा वर्षांचा मुलगा अडसर ठरत होता. त्यामुळे आईनेच मुलाला प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या हवाली केले.

तोंडात कापडी बोळा कोंबून हत्या

सहा वर्षांच्या मुलाला प्रियकर नवनाथ जगधने आणि त्याच्या मित्राने अंबड-घनसावंगी रोडवर नेले. रस्त्याच्या बाजूला नेऊन त्याच्या तोंडात कापडी बोळा कोंबला. त्यानंतर निर्दयीपणे या चिमुकल्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे.

तिघांना अटक

दरम्यान आरोपी माता शीतल उघडे हिच्यासह तिचा प्रियकर नवनाथ जगधने आणि एका साथीदाराला अंबड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्यावर अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साताऱ्यात विवाहबाह्य संबंधातून मुलाची हत्या

दुसरीकडे, अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या दहा वर्षाच्या मुलाचा आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील वाई तालुक्यात घडली होती. याबाबत सातारा पोलिसांनी आई अश्विनी प्रकाश चव्हाण आणि तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार या दोघांना अटक केली होती.

बदलापुरात महिलेकडून पोटच्या मुलाचा खून

जन्मदात्या आईनेच आठ वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या (Mother murdered child) केल्याची धक्कादायक घटना मुंबईजवळील बदलापूर येथे काही महिन्यांपूर्वी घडली होती. कौटुंबिक नैराश्यातून आईने मुलाची हत्या (Mother murdered child) केल्याचा आरोप झाला होता. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली होती. शीतल मणेरे असं आरोपी आईचे नाव आहे.

सख्ख्या आईकडून मोठ्या मुलाची हत्या

दुसरीकडे, धाकट्या मुलाच्या मदतीने सख्ख्या आईनेच आपल्या मोठ्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. मुलाचा मृतदेह आरोपी मायलेकांनी घरातच पुरला होता. मात्र घरातील एकाच खोलीत नवीन टाईल्स पाहून आत्या आणि तिच्या नवऱ्याला संशय आला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे तब्बल अडीच महिन्यांनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. हरियाणातील रोहतकमध्ये अंगाचा थरकाप उडवणारा हा प्रकार घडला होता.

संबंधित बातम्या :

अनैतिक संबंधात अडथळा, आईकडून मुलाची हत्या

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, मुलीने पोलिसांना सांगितलं बाबांना किचनमध्ये पुरलंय!

Chandrapur Crime | टीव्हीवर पाहून लहान भावाची हत्या, मृतदेह पुरला, पावसामुळे हत्येचं गुपित उलगडलं

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.