AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम नवलखा यांची हायकोर्टात धाव; याचिकेतून केली ‘ही’ मागणी

मानवाधिकार कार्यकर्ते असलेले गौतम नवलखा यांनी याआधी सप्टेंबरमध्ये विशेष न्यायालयात जामीन अर्ज केला होता. प्रकृती ठीक नसल्याच्या कारणावरून त्यांनी जामीनासाठी दाद मागितली होती.

गौतम नवलखा यांची हायकोर्टात धाव; याचिकेतून केली 'ही' मागणी
गौतम नवलखाImage Credit source: social
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Dec 12, 2022 | 10:39 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात खळबळ उडून दिलेल्या भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणात गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवलखा यांनी याआधी सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात जामिनासाठी दाद मागितली होती. तेथे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी आता नियमित जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नवलखा यांना सध्या नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहातून हलवून एका घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. नवलखा हे ऑगस्ट 2018 पासून न्यायालयीन कोठडीत आहेत.

सत्र न्यायालयाने सप्टेंबरमध्ये फेटाळला होता जामीन अर्ज

मानवाधिकार कार्यकर्ते असलेले गौतम नवलखा यांनी याआधी सप्टेंबरमध्ये विशेष न्यायालयात जामीन अर्ज केला होता. प्रकृती ठीक नसल्याच्या कारणावरून त्यांनी जामीनासाठी दाद मागितली होती. मात्र विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश राजेश कटारिया यांनी त्यांना जामीन मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिला होता.

एल्गार परिषदेच्या आयोजनादरम्यान घडलेल्या गुन्ह्यात नवलखा यांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे दिसून येत आहेत, असे निरीक्षण सत्र न्यायाधीश कटारिया यांनी नोंदवले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना महिनाभर नजरकैदेत ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे.

द्विसदस्यीय खंडपीठाने घेतली अपिलाची दखल

गौतम नवलखा यांनी नियमित जामिनासाठी दाखल केलेल्या अपिलाची सोमवारी न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने गंभीर दखल घेतली. खंडपीठाने त्यांच्या अपिलावर राष्ट्रीय तपास यंत्रणेला बाजू मांडण्यास सांगितले आहे. त्यासाठी तपास यंत्रणेला नोटीस बजावण्यात आली आहे.

नवलखा हे एल्गार परिषद प्रकरणातील 15 आरोपींपैकी एक असून त्यांच्याविरोधात अद्याप खटल्यासाठी आरोपनिश्चिती करण्यात आलेली नाही. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा काय भूमिका मांडते, त्यावर नवलखा यांच्या नियमित जामीनाचे भवितव्य ठरणार आहे.

Follow Us
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...