महिलेसोबत कोण राहायचं, त्याने महिलेला का संपवलं? पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले, अखेर साऱ्याच गोष्टींचा उलगडा

अंबरनाथमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडालेली. अंबरनाथ पूर्वेच्या गायकवाड पाडा परिसरात ही घटना समोर आली होती.

महिलेसोबत कोण राहायचं, त्याने महिलेला का संपवलं? पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले, अखेर साऱ्याच गोष्टींचा उलगडा
मृतक महिला

अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडालेली. अंबरनाथ पूर्वेच्या गायकवाड पाडा परिसरात ही घटना समोर आली होती. मृतक महिला ही एका पुरुषासोबत चाळीत भाड्याच्या घरात राहत होती. पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती महिलेचा खून झाल्याचा संशय वर्तवला होता. त्यानंतर पोलिसांचा तपास सुरु होता. अखेर जवळपास 15 दिवसांनी या हत्येचं गूढ उकलण्यात यश आलं आहे. महिलेसोबत खोलीत राहाणारा व्यक्ती दुसरा-तिसरा कुणी नसून तिचा पतीच होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तसेच त्यानेच पत्नीची हत्या करुन तिची ओळख लपवण्यासाठी जाळण्याचा प्रयत्न केला, हे उघड झालं आहे.

पतीने हत्या का केली?

अंबरनाथच्या गायकवाड पाडा परिसरात काही दिवसांपूर्वी एका बंद घरात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी उल्हासनगर गुन्हे शाखेनं तपास करत या महिलेच्या पतीला बेड्या ठोकल्या आहेत. चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीला बेड्या ठोकल्याचं यानंतर समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं?

गायकवाड पाडा परिसरातील भागूबाई चिकणकर चाळीत 22 ऑगस्ट रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाचा चेहरा जाळण्यात आल्यानं तिची ओळख पटत नव्हती. मात्र उल्हासनगर गुन्हे शाखेनं केलेल्या तपासात या महिलेचं नाव सुशीला साहेबराव निकाळजे उर्फ काजल असल्याचं समोर आलं. 25 वर्षीय काजल ही तिचा पती सुरज आनंद खरात याच्यासोबत राहात होती.

पती-पत्नीमध्ये वारंवार वाद

सुरज हा काजलच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्यानं त्यांच्यात वाद होत होते. याच वादातून सुरज याने काजलचा लेसने गळा आवळून खून केला आणि तिची ओळख पटू नये यासाठी तिचा चेहरा जाळला. यानंतर घराला कुलूप लावून सुरज फरार झाला.

घरातून दुर्गंधी येत असल्याने घरमालकाने पोलिसांना बोलावलं

संबंधित घटनेनंतर दोन दिवसांनी घरातून दुर्गंध येऊ लागला. त्यामुळे घरमालकाने पोलिसांना बोलावत दरवाजा तोडला असता हा प्रकार समोर आला. यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तर उल्हासनगर गुन्हे शाखेनं याप्रकरणी समांतर तपास करत सुरजच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या चौकशीत त्याने पत्नी काजलच्या हत्येची कबुली दिली. यानंतर त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

अंबरनाथमध्ये महिला थेट स्कायवॉकवरुन पडली, उपचारासाठी मुंबईला हलवलं, नेमकं काय घडलं?

चाळीत दोन दिवसांपासून प्रचंड दुर्गंध, घरमालकाने घराचा दरवाजा उघडताच महिलेचा कुजलेला मृतदेह, हत्येचा उलगडा कसा होणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI