अंबरनाथमध्ये महिला थेट स्कायवॉकवरुन पडली, उपचारासाठी मुंबईला हलवलं, नेमकं काय घडलं?

निनाद करमरकर

| Edited By: |

Updated on: Sep 04, 2021 | 3:14 PM

अंबरनाथमध्ये एक भयानक घटना घडली आहे. एक महिला स्कायवॉकवरुन चालत असताना अचानक खाली पडली. या अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अंबरनाथमध्ये महिला थेट स्कायवॉकवरुन पडली, उपचारासाठी मुंबईला हलवलं, नेमकं काय घडलं?
अंबरनाथमध्ये महिला थेट स्कायवॉकवरुन पडली, उपचारासाठी मुंबईला हलवलं
Follow us

ठाणे (अंबरनाथ) : अंबरनाथमध्ये एक भयानक घटना घडली आहे. एक महिला स्कायवॉकवरुन चालत असताना अचानक खाली पडली. या अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिला स्कायवॉकवरुन नेमकी खाली कशी पडली? या विचारांनी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. महिला सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नाही. याशिवाय तिला जबड्यात गंभीर दुखापत झाल्याने ती सध्या बोलूही शकत नाहीय. तिला पोलिसांनी काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण महिला सध्या बोलू शकत नाहीय. त्यामुळे पूर्ण प्रकरण नेमकं काय, नेमकं काय घडलं? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मुंबईत उपचारासाठी हलवलं

भारती विशाल मेंगाळे असं या घटनेतील जखमी महिलेचं नाव आहे. ती अंबरनाथ पश्चिमेच्या बुवापाडा भागात वास्तव्याला आहे. भारती ही आज दुपारच्या सुमारास अंबरनाथ पश्चिमेच्या स्कायवॉकवरुन खाली कोसळली. या घटनेत तिचा जबडा आणि एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेनंतर तिला आधी तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्यानं तिथून तिला मुंबईला उपचारांसाठी हलवण्यात आलं.

भारतीने स्वत:हून उडी मारली?

भारतीने स्कायवॉकवरुन उडी मारल्याची चर्चा आहे. पण नेमकं काय घडलं याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. भारतीने स्वत:हून उडी मारली की तिला कुणी खाली ढकललं किंवा ती चक्कर येऊन खाली कोसळली, अशा अनेक वेगवेगळ्या शक्यता आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस संबंधित स्कायवॉवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का याचादेखील तपास करण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणी सखोल चौकशी करतील. याप्रकरणी सध्या महिलेने पोलिसांना कोणतंही स्टेटमेंट दिलेलं नाही. त्यामुळे या गोष्टीची अधिकृत पुष्टी होऊ शकलेली नाही.

अंबरनाथमध्ये कार नाल्यात कोसळली

दुसरीकडे अंबरनाथमध्ये आणखी एका अपघाताची बातमी समोर आलेली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या गावदेवी मंदिर परिसरात आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त कार घेऊन चालक गावदेवीकडून वुलन चाळीच्या दिशेनं निघाला होता. मात्र गावदेवीच्या नाल्याजवळ कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि नाल्याला रेलिंग्ज नसल्यानं कार थेट नाल्यात जाऊन कोसळली. या घटनेनंतर कारचालकानं बाहेर येऊन क्रेन बोलावली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्यानं ही कार बाहेर काढण्यात आली. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा :

पारनेरच्या एटीएम चोरीमधील म्होरक्या, बनावट नोटा छापण्यात मास्टरमाईंड, पोलिसांकडून 24 तासांत बेड्या

थ्री स्टार हॉटेलमध्ये आठ महिने राहिला, दोन सुपर डीलक्स रुममध्ये ऐशोआरामात वावरला, 25 लाखांचं बिल भरण्याची वेळ येताच…

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI