चाळीत दोन दिवसांपासून प्रचंड दुर्गंध, घरमालकाने घराचा दरवाजा उघडताच महिलेचा कुजलेला मृतदेह, हत्येचा उलगडा कसा होणार?

अंबरनाथमध्ये एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या गायकवाड पाडा परिसरात ही घटना समोर आली आहे.

चाळीत दोन दिवसांपासून प्रचंड दुर्गंध, घरमालकाने घराचा दरवाजा उघडताच महिलेचा कुजलेला मृतदेह, हत्येचा उलगडा कसा होणार?
प्रातिनिधिक फोटो

अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथमध्ये एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या गायकवाड पाडा परिसरात ही घटना समोर आली आहे. मृतक महिला ही एका पुरुषासोबत चाळीत भाड्याच्या घरात राहत होती. पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती महिलेचा खून झाल्याचा संशय वर्तवला आहे.

नेमकं प्रकरण काय?

अंबरनाथ पूर्वेच्या गायकवाड पाडा परिसरात भागूबाई चाळ आहे. या चाळीत एक महिला आणि पुरुष गेल्या काही दिवसांपासून भाड्याने खोली घेऊन राहात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही खोली बंद होती. त्यातच या घरातून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने घरमालकाने घराचं कुलूप तोडून आत पाहिलं असता एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळून आला.

पोलीस घटनास्थळी दाखल

संबंधित घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी मृतक महिलेची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला आहे.

पोलिसांचा तपास सुरु

संबंधित महिलेसोबत राहणारा पुरुष हा नेमका कोण होता आणि त्यानेच ही हत्या केली आहे का? याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांकडून एक विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

पोलिसांच्या 12 टीम, चार शहरांमध्ये तपास, नालासोपाऱ्यातील ज्वेलर्स मालकाची भर दिवसा हत्या करणाऱ्या दरोडेखोरांना बेड्या

मुंबईत कामासाठी पहिल्यांदाच आला, रेल्वेत लहान मुलीच्या हातात मोबाईल बघून नजर फिरली, आता थेट जेलमध्ये रवानगी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI