रेल्वे प्रवासासाठी खोटं ओळखपत्र बनवून देतो, फेसबुकवर आवाहन करणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरात सर्वसामान्यांना लोकल ट्रेनच्या प्रवासावर निर्बंध आहेत (Kalyan Police arrest youth who make fake ID card)

रेल्वे प्रवासासाठी खोटं ओळखपत्र बनवून देतो, फेसबुकवर आवाहन करणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 8:58 PM

कल्याण (ठाणे) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरात सर्वसामान्यांना लोकल ट्रेनच्या प्रवासावर निर्बंध आहेत. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेन प्रवासाची मुभा आहे. असं असताना एका तरुणाने थेट फेसबुकवर लोकल ट्रेनचा पास बनवून देतो, असं घोषित केलं. त्यानंतर त्याने अनेकांना बनावट पास बनवून दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तरुणाचं नाव धनंजय बनसोडे असं आहे. त्याच्या या गैरकृत्याचा अखेर घडा भरला आणि या भामट्याला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून किती लोकांना प्रमाणपत्र घेतले याचा शोध पोलीस घेत आहेत (Kalyan Police arrest youth who make fake ID card).

पोलिसांनी आरोपीला बेड्या कशा ठोकल्या?

काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे क्राईम ब्राँच युनिटच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की, रेल्वेतील काही प्रवाशांना रेल्वे प्रवास करण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ही धक्कादायक माहिती समोर आल्यावर कल्याण रे्ल्वे क्राईम ब्राँच युनिटच्या पोलिस अधिकाऱ्यांनी याचा तपास सुरु केला. युनिटचे एपीआय अरशद शेख यांच्या पथकाने या व्यक्तिचा शोध सुरु केला. अखेर धनंजय बनसोडे या व्यक्तिला डोंबिवलीहून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ओळखपत्रे तयार करण्याची सामग्री पोलिसांनी हस्तगत केली आहे.

आरोपीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

धनंजय बनसोडे याने ओळखपत्र तयार करुन देण्यासाठी फेसबूक द्वारे लोकांना आवाहन केले होते. याच माध्यमातून तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे (Kalyan Police arrest youth who make fake ID card).

पैसे कमावण्याच्या लालसेपोटी असे कृत्य

धनंजय बनसोडे या तरुणाचे आतापर्यंत किती लोकांना प्रमाणपत्र दिले, याचा तपास पोलीस करीत आहेत.  धनंजय हा मुंबई येथील एका कॉल सेंटरमध्ये खाजगी कंत्राटदाराकडे कामाला होता. तीन महिन्यांपासून त्याला पगार मिळाली नाही. पैसे कमावण्याच्या लालसेपोटी त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा : भर दुपारी दरोडेखोर बांधकाम व्यावसायिकाच्या घरात घुसला, 50 लाखांच्या खंडणीची मागणी, नागपूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

Non Stop LIVE Update
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.