Aryan Khan | दर शुक्रवारी NCB ऑफिसवारी टळली, आर्यन खानच्या जामीन अटीत बदल

| Updated on: Dec 15, 2021 | 3:39 PM

आता दर शुक्रवारी आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसमोर हजर राहण्याची गरज नाही, मात्र आवश्यकता असेल तर आर्यन खानला एसआयटी दिल्लीसमोर हजर राहणे आवश्यक आहे, असं न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी स्पष्ट केले.

Aryan Khan | दर शुक्रवारी NCB ऑफिसवारी टळली, आर्यन खानच्या जामीन अटीत बदल
Aryan-Shah rukh khan
Follow us on

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या जामिनाच्या अटीत बदल करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता दर शुक्रवारी आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसमोर (Narcotics Control Bureau) हजर राहण्याची गरज नाही. आर्यन खानला 3 ऑक्टोबर रोजी मुंबई-गोवा क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने (Mumbai Goa Cruise Drugs Party NCB Raid) बेड्या ठोकल्या होत्या.

कोर्टाने काय सांगितलं

आता दर शुक्रवारी आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसमोर हजर राहण्याची गरज नाही, मात्र आवश्यकता असेल तर आर्यन खानला एसआयटी दिल्लीसमोर हजर राहणे आवश्यक आहे, असं न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी एनसीबीला 72 तासांची पूर्वसूचना द्यावी लागणार आहे. तर मुंबईच्या बाहेर प्रवास करण्याच्या अटीच्या संदर्भात न्यायालयाने सांगितले, की आर्यन खानला तपास अधिकाऱ्याला त्यांचा प्रवास कार्यक्रम अगोदर सादर करावा लागेल.

आर्यन खानला 28 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबई हायकोर्टने क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात 13 अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला होता. सध्या आर्यन खान प्रकरणाचा तपास एनसीबी एसआयटी करत आहे. ही टीम दिल्लीत आहे. मुंबई एनसीबी कार्यालयात दर शुक्रवारी हजेरी लावणे योग्य नाही, त्याच बरोबर सुरक्षा यंत्रणेवरही ताण असतो. म्हणून जामीन अटीत बदल करण्याची मागणी मुंबई हायकोर्टात आर्यन खानतर्फे  करण्यात आली होती. याबाबत सुनावणी दरम्यान एनसीबीतर्फेही जामिनाच्या अटीत सुधारण्या करण्यास विरोध करण्यात आला नाही.

इतर बातम्या :

सुनील पाटीलला क्रुझ ड्रग्ज पार्टीची माहिती होती, पाटीलने सॅम डिसूजाला दिली होती माहिती; कंबोज यांचा दावा

आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप असणारे सुनील पाटील कोण?; वाचा सविस्तर