कुर्ल्यातील तरुणीच्या हत्येप्रकरणी प्रियकर ताब्यात, आरोपी म्हणतो मी बलात्कार केलाच नाही

मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील एचडीआयएल कंपाऊंडमधील एका रिकाम्या इमारतीच्या छतावर गुरुवारी 23 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता. बलात्कार करून तिची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा संशय होता.

कुर्ल्यातील तरुणीच्या हत्येप्रकरणी प्रियकर ताब्यात, आरोपी म्हणतो मी बलात्कार केलाच नाही
crime News
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 8:44 AM

मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावला. तरुणीचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लग्नाचा तगादा लावल्यामुळे प्रियकराने मित्राच्या मदतीने तिची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र मी बलात्कार केलाच नाही, असा दावा आरोपी प्रियकराने प्राथमिक चौकशीत केला आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील एचडीआयएल कंपाऊंडमधील एका रिकाम्या इमारतीच्या छतावर गुरुवारी 23 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता. बलात्कार करून तिची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा संशय होता. इन्स्टाग्राम रील व्हिडीओ शूट करण्यासाठी गेलेल्या काही तरुणांना या युवतीचा मृतदेह सर्वप्रथम आढळला होता.

प्रियकर आणि त्याचा मित्र ताब्यात

या तरुणीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारावर मृत तरुणीचा प्रियकर रेहान शेख (20) आणि त्याचा मित्र फैजल शेख (20) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

लग्नाचा तगादा लावल्याने काटा काढला

तरुणीने लग्नासाठी आरोपीच्या मागे तगादा लावला होता, पण त्याला तिच्याशी लग्न करायचे नसल्यामुळे त्याने मित्र फैजलच्या मदतीने तिची हत्या केली, असं चौकशीत समोर आलं.

बलात्कार केलाच नसल्याचा दावा

प्राथमिक चौकशीत आरोपीने हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार केला नसल्याचे पोलिसांना सांगितले होते, पण पोलीस त्याबाबत अधिक चौकशी करत आहेत.

इन्स्टाग्राम व्हिडीओ शूटला गेलेले तरुण

कुर्ल्याच्या एचडीआयएल कंपाऊडमधील ही इमारत बंद असते. मात्र 18 वर्षांचा एक तरुण आपल्या दोन मित्रांसह इन्स्टाग्राम रील व्हिडीओ शूट करण्यासाठी या इमारतीमध्ये गेला होता. त्यावेळी त्याने सर्वात आधी तरुणीचा मृतदेह पाहिल्याची माहिती आहे. तरुणाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सर्वप्रथम या प्रकाराची माहिती दिली.

संबंधित बातम्या :

कुर्ल्यात 20 वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या, इन्स्टा व्हिडीओ शूटिंगसाठी गेलेल्या तरुणांना आढळला मृतदेह

भिंतीवर सुसाईड नोट, कुटुंबातील पाच जणांसह कुत्र्यालाही विष दिलं, आजी-नातीचा मृत्यू

भंडाऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या, घरात घुसून चाकूने सपासप वार