कुर्ल्यात 20 वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या, इन्स्टा व्हिडीओ शूटिंगसाठी गेलेल्या तरुणांना आढळला मृतदेह

कुर्ल्यातील एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवर लिफ्ट रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

कुर्ल्यात 20 वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या, इन्स्टा व्हिडीओ शूटिंगसाठी गेलेल्या तरुणांना आढळला मृतदेह
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape) करुन तिची हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. कुर्ला (Kurla) भागातील एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवर तरुणी मृतावस्थेत आढळली होती. इन्स्टाग्राम रील व्हिडीओ शूट करण्यासाठी गेलेल्या काही तरुणांना या युवतीचा मृतदेह सर्वप्रथम आढळल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

कुर्ल्यातील एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवर लिफ्ट रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. ही घटना कधी घडली, पीडित तरुणी नेमकी कोण आहे, तिच्यावर बलात्कार करणारे आरोपी कोण आहेत, याविषयी अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

इन्स्टाग्राम व्हिडीओ शूटला गेलेले तरुण

एचडीआयएल कंपाऊडमधील ही इमारत बंद असते. मात्र 18 वर्षांचा एक तरुण आपल्या दोन मित्रांसह इन्स्टाग्राम रील व्हिडीओ शूट करण्यासाठी या इमारतीमध्ये गेला होता. त्यावेळी त्याने सर्वात आधी तरुणीचा मृतदेह पाहिल्याची माहिती आहे.

तरुणीच्या डोक्यावर गंभीर जखमा

तरुणाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सर्वप्रथम या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. तरुणीच्या डोक्यावर गंभीर जखमा असून घटनास्थळाचा पोलीस पंचनामा करत आहेत. एचडीआयएल कॉलनीमध्ये परिसरातील झोपडपट्टीवासियांचे नुकतेच पुनर्वसन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

भिंतीवर सुसाईड नोट, कुटुंबातील पाच जणांसह कुत्र्यालाही विष दिलं, आजी-नातीचा मृत्यू

भंडाऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या, घरात घुसून चाकूने सपासप वार

मैत्रिणींसमोर ‘चरसी’ म्हटल्याचा राग, कॉलेज विद्यार्थ्यांची मारहाण, नवी मुंबईत तरुणाची आत्महत्या

Published On - 11:43 am, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI