क्रुझ रेव्ह पार्टी प्रकरणी नवी मुंबईतून ड्रग पेडलरला अटक, आर्यन खानला समोर बसवून NCB चौकशी?

| Updated on: Oct 04, 2021 | 10:04 AM

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीतर्फे कोर्टात देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे एकूण 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या 22 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 1 लाख 33 हजार रुपये रोख सुद्धा क्रुझवर एनसीबीतर्फे करण्यात आलेल्या ड्रग्ज प्रकरणात सापडले आहेत

क्रुझ रेव्ह पार्टी प्रकरणी नवी मुंबईतून ड्रग पेडलरला अटक, आर्यन खानला समोर बसवून NCB चौकशी?
Aryan Khan
Follow us on

मुंबई : मुंबईत एनसीबीतर्फे उद्ध्वस्त करण्यात आलेल्या हायप्रोफाईल क्रुझ ड्रग्ज पार्टी केसमध्ये नवी मुंबईच्या बेलापूरमधून एका ड्रग पेडलरला रविवारी अटक करण्यात आली आहे. मात्र अटकेतील आरोपी हा ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या चेनशी निगडित असल्याने त्याची कसून चौकशी करण्यासाठी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह तिन्ही आरोपींची एक दिवसाची कोठडी एनसीबी अधिकाऱ्यांना मिळाली आहे. त्यामुळे अटकेतील ड्रग्ज पेडलर आणि आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांची समोरासमोर बसवून चौकशी केल्यानंतर काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सर्वांचं लक्ष याकडे लागलं आहे, की अटकेतील ड्रग पेडलर काय महत्त्वाची माहिती एनसीबी अधिकाऱ्याना देणार आहे.

काय आहे प्रकरण?

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीतर्फे कोर्टात देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे एकूण 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या 22 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 1 लाख 33 हजार रुपये रोख सुद्धा क्रुझवर एनसीबीतर्फे करण्यात आलेल्या ड्रग्ज प्रकरणात सापडले आहेत. या प्रकरणात आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितलं की आर्यनवर असलेले आरोप हे जामीनपात्र आहेत, मात्र त्यांनी आर्यनला एकच दिवसाची कस्टडी एनसीबीला देण्यात यावी, असं अर्ज केला. त्यांनी आर्यनबाबत युक्तिवाद करताना कोर्टात सांगितलं की आर्यनला आयोजकांनी विशेष निमंत्रण देऊन बोलवलं होतं. त्याच्याकडे बोर्डिंग पास किंवा तिकीटही नव्हतं. त्याच बरोबर क्रुझवर बोर्डिंग करताना झालेल्या चौकशीत त्याच्याकडे काहीच सापडलेलं नव्हतं. त्यांनी दोन दिवसांऐवजी एकच दिवसाची कोठडी एनसीबीला देण्याची विनंती केली, जेणेकरून त्यांना रेग्युलर कोर्टात जाता येईल.

एनसीबीच्या वकिलांचा दावा काय

एनसीबीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की त्यांच्याकडे आरोपींच्या विरोधात आवश्यक पुरावे आहेत. त्याचबरोबर केसमध्ये सध्या चौकशीची सुरुवात आहे, मात्र आरोपींची अटक ड्रग पेडलर्ससोबत व्हॉट्सअप चॅट आहे, त्याच बरोबर इतर पुरावे आहेत, ज्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. त्यासाठी तिन्ही आरोपींची कस्टडी घेऊन तपास करणे गरजेचं आहे.

चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने एनसीबीतर्फे रिमांडसाठी हजर करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना एक दिवसाच्या एनसीबी कस्टडीमध्ये पाठवले असून आज तिघांना कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याचबरोबर एनसीबीतर्फे देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे या प्रकरणातील पाच इतर आरोपी नुपूर सतीजा, इस्मित सिंग चड्ढा, मोहक जैस्वाल, गोमीत चोप्रा आणि विक्रांत छोकर यांनासुद्धा अटक करण्यात आली असून उद्या या 5 आरोपींना सुद्धा रिमांडसाठी कोर्टात हजर केलं जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Aryan Khan | शाहरुखच्या पोराची कोठडी संपणार, पुढे काय काय घडणार?

संजय दत्त ते रिया चक्रवर्ती आणि आता शाहरुखच्या पोराची केस लढणारे कोण आहेत सतीश मानशिंदे?

कोण आहे अरबाझ मर्चंट ज्याचं ड्रग्जकांडमध्येही नाव आणि शाहरुखची मुलगीही करते फॉलो?