वैज्ञानिक असल्याचं भासवून 15 महिलांना लग्नाची गळ, विवाहित तरुणाकडून एक कोटींचा गंडा

| Updated on: Jan 15, 2022 | 7:26 AM

लग्नासाठी उत्सुक असलेल्या अनेक मुली आणि महिला मनाजोगता नवरा मिळावा, यासाठी अनेकदा मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवर आपले नाव नोंदवून माहिती पुरवतात. परंतु याचाच फायदा घेत त्यांच्याकडून बक्कळ पैसे उकळणाऱ्या एका ठगा विरोधात कल्याण येथे गुन्हा नोंद झाला होता.

वैज्ञानिक असल्याचं भासवून 15 महिलांना लग्नाची गळ, विवाहित तरुणाकडून एक कोटींचा गंडा
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

ठाणे : मॅट्रिमोनियल साईट्सवर फेक प्रोफाइल (Matrimonial Site) तयार करुन अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक करण्यात आली आहे. आपण वैज्ञानिक असल्याची खोटी माहिती प्रोफाईलमध्ये लिहून ‘लखोबा लोखंडे’ अनेक महिलांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भामट्याने जवळपास 15 महिलांना गंडवल्याचा आरोप केला जात आहे. आधीच लग्न झालेलं असताना देखील आरोपीने मॅट्रिमोनियल साईट्सवर नाव नोंदवलं आणि भोळ्या भाबड्या महिलांना टार्गेट केल्याचं उघडकीस (Cyber Crime) आलं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने या सर्व महिलांकडून मिळून एकूण एक कोटी रुपयांपर्यंतची रक्कम उकळल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. विवाहोच्छुक महिलांना लग्नाच्या बेडीत अडकवण्याची खोटी स्वप्न दाखवणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी खऱ्याखुऱ्या बेड्या ठोकल्या आहेत.व

काय आहे प्रकरण?

लग्नासाठी उत्सुक असलेल्या अनेक मुली आणि महिला मनाजोगता नवरा मिळावा, यासाठी अनेकदा मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवर आपले नाव नोंदवून माहिती पुरवतात. परंतु याचाच फायदा घेत त्यांच्याकडून बक्कळ पैसे उकळणाऱ्या एका ठगा विरोधात कल्याण येथे गुन्हा नोंद झाला होता.

विवाहित तरुणाकडून  महिलांची फसवणूक

पोलिसांनी या अनुषंगाने तपास करत म्हात्रे नावाच्या भामट्याला रायगडमधील उरण येथून अटक केली. 2017 मध्ये लग्न झाल्यानंतर या ठगाने आपला हा धंदा सुरु केला. आपण वैज्ञानिक असल्याची खोटी माहिती प्रोफाईलमध्ये लिहून त्याने महिलांची फसवणूक केली.

15 महिलांकडून एक कोटी उकळले

जवळपास 15 महिलांकडून तब्बल एक कोटी रुपये उकळल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली. मॅट्रिमोनियल साईट्सवर वरसंशोधन करतांना महिलांनी अत्यंत सतर्क रहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

मी भारतीय सैन्यात आहे, लग्न करशील का? पुण्यातील तरुणीवर बलात्कार करुन भामटा परागंदा

आठ वर्षात 12 महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईतील भामट्याला अटक

मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, आर्थिक फसवणूक ते अनैसर्गिक बलात्कार, पुण्यात तिघांवर गुन्हा