AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cuff Parade CCTV | आधी एकाला उडवलं, मग घाबरुन ब्रेकऐवजी अ‍ॅक्सलरेटर दाबला… खुद्द कार चालकाने सांगितला अपघाताचा थरार

अपघाताच्या वेळी कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्या रक्ताचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी दुपारी हा अपघात झाला होता

Cuff Parade CCTV | आधी एकाला उडवलं, मग घाबरुन ब्रेकऐवजी अ‍ॅक्सलरेटर दाबला... खुद्द कार चालकाने सांगितला अपघाताचा थरार
कफ परेड परिसरात भरधाव गाडीने चार जणांना उडवलेImage Credit source: TV9
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 14, 2022 | 12:37 PM
Share

मुंबई : मुंबईतील कफ परेड परिसरात (Cuff Parade) असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीजवळ झालेल्या अपघातातील आरोपी कार चालकाला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 27 वर्षीय मुकेश सिंगने त्याच्या मालकाची कार चालवताना टॅक्सीसह तिघा जणांना धडक दिली होती. पहिल्या पादचाऱ्याला धडक दिल्यानंतर आपण घाबरलो आणि ब्रेकऐवजी चुकून अ‍ॅक्सिलरेटर जोराने दाबला, असा दावा आरोपीने केला आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपीला बुधवारी कोर्टात हजर केलं असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

नेमकं काय घडलं?

अपघाताच्या वेळी कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्या रक्ताचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात बातमी दिली आहे. या अपघातात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे मुख्य लिपिक प्रसेनजीत धाडसे (वय 36 वर्ष) यांचा मृत्यू झाला, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एजीएम नितेशकुमार मंडल (वय 43 वर्ष) आणि एसबीआय कॅपिटलचे सहाय्यक उपाध्यक्ष सुजय कुमार विश्वास (वय 35 वर्ष) हे दोन बँकर आणि अन्य कार चालक आसिफ शेख (वय 44 वर्ष) गंभीर जखमी झाले आहेत.

“मंडल आणि शेख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर सुजय कुमार हे उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पादचाऱ्याने सांगितलं काय घडलं

“नमाज पढून मी तिघा जणांसोबत परत येत होतो. मी फूटपाथच्या जवळच होतो, तर माझे मित्र पुढे चालत होते. अचानक एका भरधाव कारने मला धडक दिली. मी हवेत उडून जमिनीवर पडलो. त्यानंतर ती गाडी पुढे जाऊन आणखी काही जणांना आणि टॅक्सीला धडकली” असं शेख यांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

कफ परेड परिसरात भरधाव गाडीने चार जणांना उडवले; अपघाताची भीषण घटना CCTV मध्ये कैद

कसारा घाटात एकामागून एक दोन अपघात, आधी आयशर पलटली, नंतर कंटेनर-कार अपघातात सहा महिला जखमी

इंदुरीकर महाराज अपघातातून बालंबाल बचावले, लाकडं नेणाऱ्या ट्रॅक्टरला कारची भीषण धडक

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार