AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indurikar Maharaj Accident | इंदुरीकर महाराज अपघातातून बालंबाल बचावले, लाकडं नेणाऱ्या ट्रॅक्टरला कारची भीषण धडक

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कारला अपघात झाला. इंदुरीकर महाराजांना या अपघातात कुठलीही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे, मात्र त्यांचा वाहन चालक या अपघातात जखमी झाला आहे.

Indurikar Maharaj Accident | इंदुरीकर महाराज अपघातातून बालंबाल बचावले, लाकडं नेणाऱ्या ट्रॅक्टरला कारची भीषण धडक
इंदुरीकर महाराजांच्या कारला अपघातImage Credit source: टीव्ही9
| Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 14, 2022 | 7:44 AM
Share

जालना : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. सुदैवाने इंदुरीकर महाराजांना या अपघातात कुठलीही दुखापत झालेली नाही, तर त्यांचा वाहन चालक या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. जालना जिल्ह्यातील (Jalna Accident) परतूर येथे हा अपघात झाला. काल (बुधवारी) रात्री 10 वाजताच्या सुमारास इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला. जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून कीर्तनासाठी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर (Car Accident) धडक बसली. यात कार चालकाला किरकोळ जखम झाली आहे. अपघातात इंदुरीकर महाराजांना कुठलीही इजा झाली नसल्याने समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

नेमकं काय घडलं?

आपल्या विविध वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कारला अपघात झाला. इंदुरीकर महाराजांना या अपघातात कुठलीही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे, मात्र त्यांचा वाहन चालक या अपघातात जखमी झाला आहे.

लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरशी धडक

जालना जिल्ह्यातील परतूर येथे ट्रॅक्टरला कार धडकून अपघात झाला. बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास इंदुरीकर महाराज जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून कीर्तनासाठी निघाले होते. यावेळी परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरशी धडक झाली.

ड्रायव्हरला जखम, इंदुरीकर सुखरुप

अपघातात इंदुरीकर महाराजांची गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला किरकोळ जखम झाली आहे. अपघातात इंदुरीकर महाराजांना कुठलीही इजा झाली नसल्याने समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

संबंधित बातम्या :

माझ्या क्लिपा यूट्यूबवर टाकून 4 हजार जण कोट्यधीश, त्यांचं वाटोळं होईल, दिव्यांग मुलं जन्माला येतील : इंदुरीकर

Video : ‘टपरीवाला असला तरी चालेल पण निर्व्यसनी हवा, माझी पोरगी सुखी राहील’, Indurikar महाराजांचं कीर्तन Viral

Viral Video: भंगार बापाची पैदास… तुह्या बापाला जाळ ना; इंदोरीकरांचा हा ‘रावण’ 12 मिनिटं ऐका, पुन्हा ‘रावणदहन’ करणार नाही!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली