ED ची कारवाई सुरु, अजित पवारांच्या मामाचा साखर कारखाना जप्त

अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे (Rajendra Ghadage) यांच्या जलंद्रेश्वर कारखान्यावर (Jalendrashwar Sugar) जप्तीची कारवाई करण्यात आली.

ED ची कारवाई सुरु, अजित पवारांच्या मामाचा साखर कारखाना जप्त
ed office
सुधाकर काश्यप

| Edited By: सचिन पाटील

Jul 01, 2021 | 5:53 PM

मुंबई : महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे (Rajendra Ghadage) यांच्या जलंद्रेश्वर कारखान्यावर (Jalendrashwar Sugar) जप्तीची कारवाई करण्यात आली. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. (Maharashtra state co op bank scam ED attached Ajit Pawars relative Rajendra Ghadge sugar factory)

अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवलं आहे. यानंतर साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली आहे.

65 जणांना क्लीन चिट

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत अजित पवार आणि 65 जणांना क्लीन चिट दिली होती. मुंबईच्या सेशन्स कोर्टात मागील वर्षी क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. मात्र या निकालाला माजी मंत्र्यांसह पाच जणांनी आव्हान दिलं होतं. सुरेंद्र मोहन अरोरा, माजी मंत्री शालिनीताई पाटील, माजी आमदार माणिकराव जाधव यांच्यासह आणखी दोघांनी प्रोटेस्ट याचिका दाखल केली होती.

बड्या नेत्यांची नावं

25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता. 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावं होती.

सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह 70 जणांवर कलम 420, 506, 409, 465 आणि कलम 467 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे या गुन्हा दाखल झालेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भाजपात असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांची नावं होती.

अजित पवारांसह 65 जणांना दिलासा

दरम्यान, राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासह 65 संचालकांना फेब्रुवारी 2021 मध्ये दिलासा मिळाला होता. सहकार विभागाच्या अहवालात अजित पवार यांच्यासह 65 संचालकांना क्लीन चिट मिळाली. फेब्रुवारी 2020 मध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंडितराव जाधव यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीकडून हा चौकशी अहवाल सहकार आयुक्तांना सादर करण्यात आला. चौकशी अहवालात अजित पवारांसह 65 संचालकांना क्लीन चिट मिळाली आहे.

संबंधित बातम्या 

शिखर बँक घोटाळा : अण्णा हजारेंची मागणी प्रधान न्यायमूर्तींकडून मान्य

अजित पवार-हसन मुश्रीफ यांना दिलासा, राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सहकार विभागाचीही क्लीन चिट

राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांच्या क्लीन चिटविरोधात माजी मंत्र्यांसह पाच जणांची याचिका   

मोठी बातमी: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणात अजित पवारांना क्लीनचिट 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें