मुलगा आणि आईला विवस्त्र करुन मारहाण, डोंबिवलीत संतापजनक घटना

डोंबिवलीत कौटुंबिक हिंसाचाराचा जो प्रकार समोर आला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रकरण तसं संवेदनशील आहे. त्यामुळे या प्रकरणातील व्यक्तींची तशी नावे सांगणं योग्य ठरणार नाही. पण जे घडलंय ते सांगणं जरुरीचं आहे.

मुलगा आणि आईला विवस्त्र करुन मारहाण, डोंबिवलीत संतापजनक घटना
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 9:52 PM

सुनील जाधव, Tv9 मराठी, डोंबिवली | 27 जानेवारी 2024 : या जगात माणुसकी जिवंत आहे, असं आपण मानतो. अनेकजण माणुसकी दाखवतातसुद्धा. सामाजिक कार्यक्रम, धार्मिकस्थळ, सामाजिक ठिकाणी माणुसकी पाहिली जाते. तिथे माणुसकी दिसते, प्रकर्षाने जाणवते. पण कुटुंबांमध्येच माणुसकी असणं किती जरुरीचं आहे. अर्थात सगळीकडे तशी परिस्थिती नसते. पण डोंबिवलीत कौटुंबिक हिंसाचाराचा जो प्रकार समोर आला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रकरण तसं संवेदनशील आहे. त्यामुळे या प्रकरणातील व्यक्तींची तशी नावे सांगणं योग्य ठरणार नाही. पण जे घडलंय ते सांगणं जरुरीचं आहे. तशा घटना पुन्हा घडू नयेत, नागरिकांनी अशा घटनांना प्रतिबंध करावं, नागरिकांमध्ये प्रबोधन व्हावं या उद्देशाने या घटनेची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. संबंधित घटना ही डोंबिवलीत घडली आहे. या घटेनेचे धक्कादायक व्हिडीओदेखील समोर आले आहेत.

संबंधित घटना काय घडली त्याच्याआधी आम्ही तुम्हाला घटनेची पार्श्वभूमी सांगतो. डोंबिवलीत एक दाम्पत्य राहायचं. दोघांना लग्नानंतर दोन मुलं झाली. पण लग्नानंतर काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांच्यात खटके उडायला लागले. त्यामुळे दोघांनी परस्परांच्या सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. महिलेने आपल्या दोन्ही मुलांना सोबत माहेरी नेलं. या महिलेचं माहेरही तसं डोंबिवलीतच. तिला दोन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. महिलेच्या पतीचं रवी (बदललेलं नाव) असं नाव आहे. या रवीला त्याच्या आईने आपल्याला नातवंडांना भेटावसं वाटत असल्याचं सांगितलं. रवीने आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलं.

रवी आणि त्याच्या आईला विवस्त्र करुन मारहाण

रवीची पत्नी तिच्या माहेरी राहायला गेली होती. ती नोकरी करते. त्यामुळे ती आपल्या आई-वडिलांकडे मुलं ठेवून कामावर जाते. रवी आपल्या आईला घेऊन त्याच्या सासरच्या मंडळींकडे गेला. पण तो सासरी गेला तेव्हा त्याच्या सासच्यांनी त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. रवीच्या सासूने आणि त्याच्या दोन्ही मेहुण्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मुलांचा आणि तुझा काय संबंध? असं म्हणत त्यांनी रवीला मारहाण केली. इतकंच नाही तर रवीच्या मेहुण्यांनी आणि सासूने त्याच्या वृद्ध आईलाही विवस्त्र करुन मारहाण केली. आरोपींचा वृद्ध वहिलेला विवस्त्र करुन मारहाण करताना व्हिडीओ समोर आलाय. हा संतापजनक प्रकार कुणीतरी कॅमेऱ्यात कैद केला आहे.

रवीच्या दोन्ही मेहुणे आणि सासूला राग इतका अनावर झाला होता की त्यांनी रवीला आणि त्याच्या आईला विवस्त्र करुन बेदम मारहाण केली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने या दोघांची सुटका झाली. याप्रकरणी रवीच्या दोन्ही मेहुणे आणि सासूवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणी आता तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे. पण संबंधित घटनेवर नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय. कुटुंबात वाद असतील पण एका वृद्ध महिलेला आणि तिच्या मुलाला विवस्त्र करुन मारहाण करणं ही माणुसकी नाही, असं मत सर्वांचं आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.