AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dagdi Chawl | डॉन अरुण गवळीची ‘दगडी चाळ’ जमीनदोस्त होणार

दक्षिण मुंबईत अरुण गवळीच्या नावामुळे परिचित झालेली दगडी चाळ येत्या काही दिवसांमध्ये पाडली जाणार आहे (redevelop Arun Gawali Dagdi Chawl)

Dagdi Chawl | डॉन अरुण गवळीची 'दगडी चाळ' जमीनदोस्त होणार
दगडी चाळ
| Updated on: May 21, 2021 | 12:51 PM
Share

मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळी (Arun Gawali) याच्या नावाशी जोडली गेलेली मुंबईतील दगडी चाळ (Dagdi Chawl) आता लवकरच जमीनदोस्त होणार आहे. ‘म्हाडा’मार्फत (MHADA) या चाळीचा पुर्नविकास करण्यात येणार आहे. दगडी चाळीतील 10 इमारतींचा या रिडेव्हलपमेंट प्रकल्पात समावेश आहे. अरुण गवळी सध्या तुरुंगात असला तरी त्याच्या कुटुंबीयांना तूर्तास दुसरे घर शोधावे लागेल. (MHADA to redevelop Don Arun Gawali residential Building Dagdi Chawl in Byculla South Mumbai)

दगडी चाळ दहशतीचा ठिकाणा

डॉन अरुण गवळी आणि दगडी चाळ हे कनेक्शन कुख्यात आहे. गवळी डॅडी या नावाने समर्थकांमध्ये परिचित आहे. मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतूनच डॉन अरुण गवळी याची सूत्रे हालत होती. ही चाळ अरुण गवळीची ओळख बनली होती. गवळीचे राहते घर असलेली चाळ ही एके काळी दहशतीचे ठिकाण झाले होते. आता या दगडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार आहे.

40 मजली टॉवर

दक्षिण मुंबईत अरुण गवळीच्या नावामुळे परिचित झालेली दगडी चाळ येत्या काही दिवसांमध्ये पाडली जाणार आहे. दगडी चाळीतील 10 इमारतींचा समावेश यात आहे. या दगडी चाळीच्या जागी आता 40 मजली टॉवर उभारला जाणार आहे. म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्विकास मंडळ अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. म्हाडामार्फत या चाळीचा पुर्नविकास करण्यात येणार आहे. म्हाडामार्फत या चाळीला लेटर ऑफ इंटेन्ट जारी करण्यात आला आहे.

डॅडी झाला आजोबा

दरम्यान, डॉन अरुण गवळी नुकताच आजोबा झाला. अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी-वाघमारे हिने नुकताच बाळाला जन्म दिला. अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी लॉकडाऊनमध्ये विवाहबंधनात अडकले होते. अक्षय आणि योगिता यांचं लग्नही दगडी चाळीतच झालं होतं.

तुरुंगातच कोरोनाची लागण

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला काही महिन्यांपूर्वी तुरुंगातच कोरोनाची लागण झाली होती. अरुण गवळीला उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले होते.

अरुण गवळीच्या पॅरोल आणि फर्लो रजा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या वर्षी जुलै महिन्यात अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती. त्याच्या काही दिवस आधीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करुन नागपूर कारागृहात परतला होता. अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला आहे.

संबंधित बातम्या :

अरुण गवळीच्या मुलीचा विवाह, कन्यादान करताना ‘डॅडी’ भावूक

डॅडींना न्यायदेवतेने सोडावं, अरुण गवळीच्या पत्नीचं देवीचरणी साकडं

(MHADA to redevelop Don Arun Gawali residential Building Dagdi Chawl in Byculla South Mumbai)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.