AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळे अरुण गवळीची प्रकृती गंभीर; उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवले

गेल्या चार दिवसांपासून अरूण गवळी याच्यावर तुरुंगातील रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. | Arun Gawli

कोरोनामुळे अरुण गवळीची प्रकृती गंभीर; उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवले
गवळीला दिवसातून तीन वेळा काढा, गरम पाणी व औषधे दिली जात होती. परंतु, या उपचारांचा विशेष फायदा झाला नाही.
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Feb 12, 2021 | 2:21 PM
Share

नागपूर: कुख्यात गुंड अरुण गवळीची प्रकृती खालावली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला (Arun Gawali) काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून अरूण गवळीची प्रकृती सातत्याने खालावत आहे. सध्या गवळीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यामुळे अरुण गवळीला आता उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. (Arun Gawali infected with Coronavirus in Jail)

काही दिवसांपूर्वी अरूण गवळीची प्रकृती खराब झाली होती. तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यांनी गवळी व इतर कैद्यांची कोरोना चाचणी करवून घेतली. त्यामध्ये अरूण गवळीसह पाच कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने अरूण गवळीसह कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांना वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवले.

गेल्या चार दिवसांपासून अरूण गवळी याच्यावर तुरुंगातील रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. गवळीला दिवसातून तीन वेळा काढा, गरम पाणी व औषधे दिली जात होती. परंतु, या उपचारांचा विशेष फायदा झाला नाही.

अखेर आज सकाळी त्याची प्रकृती प्रचंड खालावल्याने गवळीला मेडिकलमधील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. सध्या याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव अरूण गवळी याच्यावर मेडिकल का कारागृहातील रुग्णालयातच पुढील उपचार करावे, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

अरुण गवळीच्या पॅरोल आणि फर्लो रजा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुलै महिन्यात अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती. त्याच्या काही दिवस आधीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करुन नागपूर कारागृहात परतला होता. अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला आहे.

आधी पत्नीच्या आजारपणाचं कारण, नंतर लॉकडाऊनमुळे अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये मुदतवाढ

पत्नी गंभीर आजारी असल्याच्या कारणास्तव न्यायालयाने सुरुवातीला अरुण गवळीला 45 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. यानुसार, त्याला 27 एप्रिलपर्यंत आत्मसमर्पण करायचे होते. मात्र, लॉकडाऊनमुळे नागपूरला परत येणे शक्य होत नसल्याचे कारण देत अरुण गवळी याने न्यायालयात पॅरोल वाढवण्यासाठी अर्ज दिला होता. यानंतर न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला. त्यामुळे अरुण गवळीला कारागृहात हजर होण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली होती.

अरुण गवळी पॅरोलवर असतानाच लॉकडाऊनच्या काळात त्याच्या मुलीचा विवाहसोहळा देखील संपन्न झाला. अभिनेता अक्षय वाघमारे याच्यासोबत योगिता गवळी 8 मे रोजी विवाहबद्ध झाली. कन्यादान करताना अरुण गवळी भावूक झाल्याचंही दिसलं होतं. लॉकडाऊनचे नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. अक्षय आणि योगिता यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच झालं होतं.

संबंधित बातम्या :

Arun Gawli | महिनाभरात डॅडी पुन्हा बाहेर, अरुण गवळीला 28 दिवसांची फरलो रजा मंजूर

अरुण गवळीच्या मुलीचा विवाह, कन्यादान करताना ‘डॅडी’ भावूक

(Arun Gawali infected with Coronavirus in Jail)

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?