मोठी बातमी : अरुण गवळीला जेलमध्ये कोरोनाची लागण

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (Arun Gawli Corona Positive)

मोठी बातमी : अरुण गवळीला जेलमध्ये कोरोनाची लागण
गवळीला दिवसातून तीन वेळा काढा, गरम पाणी व औषधे दिली जात होती. परंतु, या उपचारांचा विशेष फायदा झाला नाही.

नागपूर : ‘डॅडी’ या नावाने प्रसिद्ध असलेले अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या अरुण गवळी नागपूर कारागृहात आहेत. त्याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहे. (Arun Gawli Corona Positive)

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण गवळीला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण दिसत होती. यानंतर त्याची चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. डॅडींसोबत इतर चार कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

अरुण गवळी हे सध्या नागपूर कारागृहात कैद आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जेलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे. कोरोनाची लागण झालेल्या सर्वच कैद्यांना स्वतंत्र जेलमध्ये ठेवून उपचार सुरु करण्यात आले आहेत.

अरुण गवळीच्या पॅरोल आणि फर्लो रजा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुलै महिन्यात अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती. त्याच्या काही दिवस आधीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करुन नागपूर कारागृहात परतला होता. अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला आहे.

आधी पत्नीच्या आजारपणाचं कारण, नंतर लॉकडाऊनमुळे अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये मुदतवाढ

पत्नी गंभीर आजारी असल्याच्या कारणास्तव न्यायालयाने सुरुवातीला अरुण गवळीला 45 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. यानुसार, त्याला 27 एप्रिलपर्यंत आत्मसमर्पण करायचे होते. मात्र, लॉकडाऊनमुळे नागपूरला परत येणे शक्य होत नसल्याचे कारण देत अरुण गवळी याने न्यायालयात पॅरोल वाढवण्यासाठी अर्ज दिला होता. यानंतर न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला. त्यामुळे अरुण गवळीला कारागृहात हजर होण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली होती.

अरुण गवळी पॅरोलवर असतानाच लॉकडाऊनच्या काळात त्याच्या मुलीचा विवाहसोहळा देखील संपन्न झाला. अभिनेता अक्षय वाघमारेसोबत योगिता गवळी 8 मे रोजी विवाहबद्ध झाली. कन्यादान करताना अरुण गवळी भावूक झाल्याचंही दिसलं होतं. लॉकडाऊनचे नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. अक्षय आणि योगिता यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच झालं. (Arun Gawli Corona Positive)

संबंधित बातम्या :

Arun Gawli | महिनाभरात डॅडी पुन्हा बाहेर, अरुण गवळीला 28 दिवसांची फरलो रजा मंजूर

अरुण गवळीच्या मुलीचा विवाह, कन्यादान करताना ‘डॅडी’ भावूक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI