Mumbai Local News : हुश्शsss लोकल अपघात होता होता राहिला! थोडक्यात मोठा अनर्थ मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे टळला

Mumbai News : लोकल आणि ट्रॅकवर आडवा पडलेल्या ड्रममध्ये झालेल्या धडकेने ड्रम लोकलच्या खाली अडकला गेला. वेळीच जर लोकल थांबवली नसती, मोठा अनर्थ घडला असता. अखेर लोकल थांबल्यानंतर लोकलच्या समोरच्या बाजूला अडकलेला हा ड्रम बाजूला करण्यात आला.

Mumbai Local News : हुश्शsss लोकल अपघात होता होता राहिला! थोडक्यात मोठा अनर्थ मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे टळला
थोडक्यात अनर्थ टळला
Image Credit source: TV9 Marathi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Sep 03, 2022 | 11:06 AM

मुंबई : गेल्या रविवारी भायखळा रेल्वे स्थानकाजवळ (Byculla Railway Station) तरुणीने धावत्या लोकलसमोर जीव देण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाचा आता भायखळा रेल्वे स्थानकाजवळ थोडक्यात लोकलचा मोठा अपघात होता होता टळलाय. (पाहा व्हिडीओ : भायखळा रेल्वे स्थानकात आत्महत्येचा प्रयत्न) महत्त्वाचं म्हणजे लोकलच्या मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हा अपघात अगदी थोडक्यात टळला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. 1 सप्टेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. याबाबतची माहिती आता समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या फास्ट लोकल ट्रॅकवर (Mumbai Local Accident News) ही घटना घडली. सीएसएमटीहून कल्याणच्या दिशेने फास्ट लोकल निघाली होती. त्यादरम्यान, भायखळा सीएसएमटी स्थानकादरम्यान थोडक्यात लोकलचा मोठा अपघात टळला.

नेमकं काय घडलं?

दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी सीएसएमटीहून कल्याण फास्ट लोकल निघाली. मात्र भायखळा जवळ एक मोठा ड्रम रेल्वे ट्रॅकवर असल्याचं मोटरमनच्या निदर्शनास आलं. लोकल चालकाने वेळीच गाडीचा वेग कमी केला आणि ब्रेक लावून लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला. समोर सिग्नल ग्रीन असतानाही लोकलच्या मोटरमनने लोकल थांबवण्यासाठी ब्रेक मारले.

ब्रेक लावले, तरी…

मोटरमनच्या चालकाने धडक रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण ब्रेक लावेपर्यंत रेल्वे ट्रॅकवर असलेला ड्रम आणि लोकल यांची एकमेकांना धडक बसलीच. या धडकेच्या वेळी कर्णकर्कश आवाज झाला. त्यामुळे एकच घबराटही उडाली. दुपारची वेळ असल्याने लोकलमध्ये फारसे प्रवासी नव्हते. पण तरीही सगळेच धास्तावले. नेमकं काय झालं, कशाचा आवाज झाला, यावरुन प्रवाशांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली.

दरम्यान, लोकल आणि ट्रॅकवर आडवा पडलेल्या ड्रममध्ये झालेल्या धडकेने ड्रम लोकलच्या खाली अडकला गेला. वेळीच जर लोकल थांबवली नसती, मोठा अनर्थ घडला असता. अखेर लोकल थांबली. त्यानंतर लोकलच्या समोरच्या बाजूला अडकलेला हा ड्रम बाजूला करण्यात आला.

ड्रममध्ये काय, तो कुणी ठेवला?

प्रवाशांच्या मदतीने हा ड्रम बाजूला केल्यानंतर पाहणी करण्यात आली. त्यावेळी या ड्रममध्ये दगड ठेवण्यात आले होते, असं दिसून आलं. अखेर याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास रेल्वे पोलिसांकडून केला जातोय. हा ड्रम नेमका कुणी आणि का रेल्वे ट्रॅकवर ठेवला, या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर यंत्रणांच्या मदतीने तपास केला जातोय.

प्रवाशांनी लोकलच्या मोटरमनचं कौतुक केलंय. अशोक कुमार शर्मा असं या मोटरमनचं नाव असून त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे प्रवाशांचा जीव वाचलाय.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे मुंबईच्या मध्य मार्गावरचं वेळापत्रक काही वेळ विस्कळीत झालं होतं. कल्याण फास्ट लोकल दुपारी 15 मिनिटं उशिराने धावत होती. भायखळा स्थानकात घडलेल्या या प्रकाराने जरी लोकलला उशीर झाला असला, तरी फास्ट असलेली ही लोकल पुढे नियोजित वेळापत्रकानुसार कल्याण रेल्वे स्ठानकात अगदी वेळेवर दाखल झाली होती.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें