Mumbai Crime : अंधेरीत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, ‘अशी’ सुरु होती फसवणूक

अंधेरी परिसरात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सोशल मीडियाचा वापर करुन आरोपी नागरिकांची फसवणूक करत असत.

Mumbai Crime : अंधेरीत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, 'अशी' सुरु होती फसवणूक
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 4:29 PM

मुंबई / 15 ऑगस्ट 2023 : अंधेरीत एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 8 ने ही कारवाई केली. याप्रकरणी 13 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, 12 जणांना अटक केली आहे. सर्व आरोपींना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपी दिल्लीचे रहिवासी असून, मुंबई आणि दिल्लीत हे रॅकेट चालवत होते. आरोपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत नागरिकांची फसवणूक करायचे. रॅकेटचा पर्दाफाश होताच अनेक जण समोर येऊन फसवणुकीची तक्रार देत आहेत.

काय आहे प्रकरण?

अंधेरीतील मरोळ परिसरात बनावट कॉल सेंटर सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 8 आठने शुक्रवारी या कॉल सेंटरवर छापा टाकला. यात एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी 12 जणांना केली आहे. मृदुल जोशी असे मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. आरोपी Google, Facebook आणि Instagram सारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सवलतीत विमान तिकिटाची जाहिरात करायचे.

ही जाहिरात पाहून नागरिक तिकिटासाठी संपर्क साधायचे. नागरिकांकडून लुटलेले पैसे आरोपी वेगवेगळ्या खात्यात वळते करायचे. आरोपींनी 400 अधिक बँकखाती खोलली होती. दररोज आरोपी चार ते पाच नागरिकांना लक्ष करुन पैसे लुटायचे. अखेर या कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आहे. रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय ग्राहकांनी ई-मेलद्वारे मुंबई पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली आहे.

हे सुद्धा वाचा

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', नितेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', नितेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....