Dombivali Crime : डोंबिवलीत लज्जास्पद कृत्य, निवृत्त जवानाच्या पत्नीचा विनयभंग

कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारी घटना थांबण्याचे नावच घेत नाही. गुन्हेगार खुलेआम गुन्हे करत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Dombivali Crime : डोंबिवलीत लज्जास्पद कृत्य, निवृत्त जवानाच्या पत्नीचा विनयभंग
डोंबिवलीत सोशल मीडियावर फोटो व्हायरल करत महिलेची बदनामीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 2:51 PM

डोंबिवली / 15 ऑगस्ट 2023 : डोंबिवलीत महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. खुलेआम आरोपी महिलांवर अत्याचार, विनयभंग करताना दिसतात. अशीच एक घटना डोंबिवलीत पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. सोसायटीच्या बैठकीत निवृत्त जवानाच्या पत्नीला शिवीगाळ करत घाणेरडा स्पर्श करुन तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. मात्र सुशिक्षितांच्या डोंबिवलीत भारतीय निवृत्त सैनिकाच्या महिलेचा विनयभंग झाल्याने सध्या एकच खळबळ उडाली आहे. महेश ठोंबरे असे आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

डोंबिवलीच्या मानपाडा परिसरातील गोल्डन ड्रीम लोढा सोसायटीमध्ये हस्तांतरण संदर्भात सोसायटीच्या सदस्यांची मिटिंग ठेवण्यात आली होती. या बैठकीत सर्व घर मालक आणि विकासक हजर होते. याच सोसायटीतील एक घरमालक महिला मिटिंगसाठी आली होती. मात्र सदर महिला डोंबिवलीत वास्तव्य करत नसल्याने आरोपी तिला मिटिंगमध्ये येण्यास मज्जाव करत होता. यामुळे पीडित महिलेने सदर महिलेला सपोर्ट केला. यामुळे आरोपी पीडितेवर संतापला.

भरसभेत आरोपीने पीडित महिलेला अश्लील हावभाव करत अर्वाच्य भाषा वापरली. तसेच सर्वांसमक्ष लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श महिलेला केला. यानंतर बिल्डरचे प्रोजेक्ट हेड आणि मॅनेजर यांनी मध्यस्थी करुन प्रकरण शांत केले. त्यानंतर मिटिंगनंतर आरोपी महिलेकेड रागाने पाहत निघून गेला. महिलेने याबाबत मानपाडा पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली.

हे सुद्धा वाचा

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. मानपाडा पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.