अशी ही बनवाबनवी!; जमिनीतून सोने सापडले म्हणून कमी किमतीत विकायचे…

या चौघांना शिवपार्क भाटपाडा विरार येथून अटक करण्यात आली आहे. हे चारही जण दुसऱ्या व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न करत होते.

अशी ही बनवाबनवी!; जमिनीतून सोने सापडले म्हणून कमी किमतीत विकायचे...
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 8:37 PM

मुंबई : घर खोदत असताना जमिनीतून सोने सापडल्याचे सांगण्यात येत होते. यातून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्या टोळीतील  (cheating gang) चार जणांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक ( Kasturba Marg police ) केली आहे. पोलिसांनी या गुंडांकडून 5 किलो बनावट सोन्याचे दागिने आणि 10 लाखांची रोकड जप्त केली आहे. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका वृद्धाने काही दिवसांपूर्वी ही तक्रार दिली होती. आपल्याला काही जणांनी भेटून ५० लाखांची फसवणूक केल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी टीम तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. तेव्हा ही टोळी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील असल्याचे निष्पन्न झाले.

या चार जणांना अटक

मुंबईतील विविध भागात जाऊन ते आधी लोकांना खरे सोने दाखवत होते. नंतर पैसे घेऊन बनावट सोन्याचे दागिने देऊन पळून जातात. विजयकुमार प्रेमप्रकाश राय (वय ३३), विनय मणिलाल परमार (वय २०), मणिलाल गोमासिंग परमार (वय ४३) आणि जीवदेवी मणिलाल परमार (वय ६३) अशी अटकेतील आरोपींची नावं आहेत.

या चौघांना शिवपार्क भाटपाडा विरार येथून अटक करण्यात आली आहे. हे चारही जण दुसऱ्या व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न करत होते.

वृद्धेने दिली होती तक्रार

तक्रारदार वृद्धेला या लोकांनी सांगितले की, घरात खोदकाम करताना गुप्तधन सापडले आहे. परंतु तो उघड करेल म्हणून तो कोणत्याही सोनाराला विकू शकत नाही.

या गुंडांविरुद्ध मुंबईसह देशातील इतर राज्यांतही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. अशी माहिती परिमंडळ १२ च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी दिली.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.