Mumbai Lift Accident | मुंबईत दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, पाच जण गंभीर जखमी

Mumbai Lift Accident | मुंबईत दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, पाच जण गंभीर जखमी
प्रातिनिधीक फोटो

मुंबईतील अंधेरी पूर्व भागातील गावठाण भागात आझाद रोडवर गुंदवली बस स्टॉपच्या समोर असलेल्या महाकाली दर्शन सोसायटीत (Mahakali Darshan Society) हा अपघात झाला. एसआरए प्रकल्पा अंतर्गत उभारलेली ही 16 मजली इमारत आहे.

रमेश शर्मा

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 13, 2021 | 3:01 PM

मुंबई : दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळून मुंबईत भीषण अपघात (Mumbai Lift Accident) झाला. अंधेरी पूर्व भागातील (Andheri East) बहुमजली इमारतीत (Tall Building) हा प्रकार घडला. या अपघातात पाच रहिवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

पाच जण गंभीर जखमी

मुंबईतील अंधेरी पूर्व भागातील गावठाण भागात आझाद रोडवर गुंदवली बस स्टॉपच्या समोर असलेल्या महाकाली दर्शन सोसायटीत (Mahakali Darshan Society) हा अपघात झाला. एसआरए प्रकल्पा अंतर्गत उभारलेली ही 16 मजली इमारत आहे. लिफ्ट 10 व्या मजलावरुन खाली कोसळून चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

आज (सोमवारी) दुपारी बारा वाजून 52 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिस सुद्धा घटनास्थळावर पोहोचले असून त्यांनी बचावकार्य सुरु केले आहे.

जखमींवर रुग्णालयात उपचार

जखमींना इमारतीमध्ये राहणार्‍या स्थानिक रहिवाशी आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून रेस्क्यू करण्यात आले. त्यांना जवळच्या आदित्य नर्सिंग होम या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

संबंधित बातम्या :

बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेलेल्या प्रेमी युगुलाला मारहाण, अकोल्यात संतापजनक प्रकार

30 वर्षीय महिलेचा डोकं उडवलेला नग्न मृतदेह, माथेरानच्या लॉजमधील हत्याकांडाचे धागे गोरेगावपर्यंत कसे पोहोचले?

VIDEO | कुटुंब रंगलंय ‘Fighting’मध्ये, मुलगी-मामा आणि आई, औरंगाबादेत भररस्त्यात हातघाई

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें