AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरायचे, असा झाला टोळीचा पर्दाफाश

बसस्थानकात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामुळे पोलिसांनी अॅक्शन मोडवर येत तात्काळ कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Mumbai Crime : बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरायचे, असा झाला टोळीचा पर्दाफाश
बसस्थानकात मोबाईल चोरणारी टोळी अटकImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Aug 08, 2023 | 10:02 AM
Share

मुंबई / 8 ऑगस्ट 2023 : बसस्थानकांमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. बसस्थानकात चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आणि चोरीचा तपास सुरु केला. पोलिसांनी कारवाई करत मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. आरोपींकडून विविध कंपन्यांचे 74 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मोबाईलची किंमत सुमारे 7 लाख 35 हजार रुपये आहे. सलीम रईस शेख, अल्ताफ तुर्बाली रुपाणी, शहाब इन्साफ खान, रमजान बबमिया लांजेकर आणि हमीद अहमद खान अशी अटक आरोपींची नावे आहेत.

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी अटक

आरोपी बसस्थानकात सावज हेरायचे बसमध्ये चढता-उतरताना धक्काबुक्की करत ते प्रवाशांच्या खिशातून, महिलांच्या पर्समधून मोबाईल काढायचे आणि एकमेकांकडे पास करायचे. मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर येथील बसस्थानकावर मोबाईल चोरीच्या घटना वाढत होत्या. वाढत्या तक्रारी पाहता कांदिवली पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला. पोलिसांनी सर्व बसस्थानकातील सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीत चोरट्यांचा कारनामा कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत त्यांना अटक केली आहे.

आरोपींच्या टोळीत आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा तपास कांदिवली पोलीस करत आहेत. आरोपींनी मोबाईल चोरल्यानंतर कोणाला विकले? याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.

Follow Us
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप