Mumbai Crime : गरोदर पत्नीला चेकअपसाठी रुग्णालयात घेऊन गेला, तपासणीदरम्यान जे समोर आलं ते त्याने डॉक्टर हैराण !

पत्नी गरोदर राहिली, म्हणून पती तिला मेडिकल चेकअपसाठी रुग्णालयात घेऊन गेला. डॉक्टरांनी चेकअप सुरु करताच वेगळेच सत्य समोर आलं.

Mumbai Crime : गरोदर पत्नीला चेकअपसाठी रुग्णालयात घेऊन गेला, तपासणीदरम्यान जे समोर आलं ते त्याने डॉक्टर हैराण !
गरोदर महिलेला चेकअपला घेऊन गेला तर...
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 1:46 PM

मुंबई / 29 ऑगस्ट 2023 : पत्नी गरोदर असल्याने पती तिला सरकारी रुग्णालयात चेकअपसाठी घेऊन गेला. डॉक्टर चेकअप करत असतानाच डॉक्टरांना संशय आला म्हणून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर पतीला थेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तपासणी दरम्यान पत्नी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. सदर मुलीचे वय केवळ 12 वर्षे 7 महिने आहे. तर पतीचे वय 28 वर्षे आहे. यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चारकोप पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी पतीला अटक केली असून, त्याच्याविरोधात बलात्काराशी संबंधित आयपीसी कलम आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

‘असा’ उघड झालं प्रकरण

आरोपी मूळचा बिहार येथील रहिवासी असून, याच वर्षी त्याचा पीडितेसोबत विवाह झाला होता. यानंतर जूनमध्ये दोघे पती-पत्नी मुंबईत आले. कांदिवली परिसरात दोघे भाड्याच्या घरात राहत होते. दरम्यान, मुलगी गरोदर राहिली. तिच्या पोटात दुखत असल्याने पती तिला शताब्दी रुग्णालयात चेकअपसाठी घेऊन गेला. डॉक्टर मुलीचे चेकअप करत असताना त्यांना मुलगी अल्पवयीन असल्याचा संशय आला.

डॉक्टरांनी मुलीच्या वयाबाबत चौकशी केली असता ती 12 वर्षाची असल्याचे उघडकीस आले. यानंतर रुग्णालय प्रशासनाने चारकोप पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याबाबत पोलीस आता दोन्ही कुटुंबावर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.