Mumbai Crime : डायबिटिज असूनही पत्नी मिठाई मागत होती, पती संतापला अन् अनर्थ घडला !

मुलगा अनेरिकेत नोकरीनिमित्त राहत होता. वृद्ध जोडपे एकटेच घरी राहत होते. दोघेही डायबिटिजचे रुग्ण होते. मात्र तरीही महिलेला मिठाई खाण्याची सवय होती. मात्र तिच्या याच सवयीमुळे अनर्थ घडला.

Mumbai Crime : डायबिटिज असूनही पत्नी मिठाई मागत होती, पती संतापला अन् अनर्थ घडला !
मिठाई मागत होती म्हणून पतीने वृद्ध पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 12:01 PM

मुंबई / 29 ऑगस्ट 2023 : मुंबई एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. डायबिटिज असताना पत्नी वारंवार मिठाई खायला मागत होती. यामुळे संतापलेल्या वृद्ध पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पतीलाही गेल्या 40 वर्षांपासून डायबिटिजचा त्रास आहे. समता नगर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. विष्णुकांत बालुर असे आरोपी पतीचे नाव आहे. तर शकुंतला बालुर असे मयत पत्नीचे नाव आहे. दाम्पत्याचा मुलगा नोकरीनिमित्त अमेरिकेत राहतो. पोलिसांनी मुलाला आईच्या मृत्यूबाबत कळवले आहे.

बालुर दाम्पत्याला डायबिटिजचा त्रास होता. डाबिटिज असतानाही पत्नी मिठाई खायची. डॉक्टरने अनेकदा मनाई करुनही पत्नी ऐकत नव्हती. मिठाई दिली नाही तर भांडण करायची. यामुळे वारंवार पत्नीची तब्येत बिघडायची आणि पतीला तिची सेवा करावी लागायची. पती अंथरुणावरच असल्याने पती आधीच वैतागला होता. आरोपी पती एका खाजगी कंपनीतून सीआओ पदावरुन निवृत्त झाला होता. दाम्पत्याच्या देखभालीसाठी एक महिला कामासाठी यायची.

अशी उघडकीस आली घटना

कामवाली महिला नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता आली. तिने अनेकदा दरवाजाची बेल वाजवली. मात्र दरवाजा उघडला नाही. मग तिने विष्णुकांत यांना फोन केला. मात्र ते ही फोन उचलत नव्हते. मग कामवालीने वॉचमनला सदर बाब सांगितली. वॉचमननेही विष्णुकांत यांना फोन लावला, मात्र त्याचाही फोन उचलला नाही. मग वॉचमन कामवाली बाईसोबत पुन्हा दाम्पत्याच्या फ्लॅटजवळ आला. तर दरवाजा उघडा दिसला.

हे सुद्धा वाचा

कामवालीने आत जाऊन पाहिले तर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तर पती खुर्चीत बसला होता. पतीलाही इजा झाली होती. महिला जिवंत होती. शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दाम्पत्याला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. पोलिसांनी दाम्पत्याच्या मुलाला घटनेबाबत कळवले आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.